पत्रकार राजेंद्र यादव यांना कळंब तालुका पत्रकार संघाचा पुरस्कार जाहीर

0

कळंब ( प्रतिनिधी)-  तालुका पत्रकार संघाचे मानाचे पुरस्कार जाहीर करण्यात आले असून, या वर्षी शहाजी चव्हाण यांच्या तूळजाई प्रतिष्ठान या संस्थेला  समाजसेवेसाठी, तर पत्रकारिते साठी दिल्ली येथील  निलेशकुमार कुलकर्णी, सांगोला येथील  राजेंद्र यादव, शिरीष रणदिवे, निळकंठ कांबळे तर आदर्श क्रीडा शिक्षक पुरस्कार  ईटकुर जिल्हा परिषद शाळेतील  अनिल शिंदे याना जाहीर करण्यात आला आहे.

पुरस्काराचे हे २७ वे वर्ष आहे. फेब्रुवारी मध्ये मान्यवरांच्या उपस्थितीत या पुरस्काराचे वितरण होणार असल्याची माहिती कळंब तालुका पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी दिली.

कळंब तालुका पत्रकार  संघाच्या सदस्यांची  बैठक पत्रकार भवन येथे अशोक शिंदे यांच्या अध्यक्ष ते खाली घेण्यात आली. या वेळी विविध विषयावर चर्चा करण्यात येवून , या वर्षी चे पुरस्कार जाहीर करण्यात आले.

▪️शि.म.ज्ञानदेव मोहेकर राज्यस्तरीय पत्रकारिता पुरस्कार दिल्ली येथील  निलेशकुमार  कुलकर्णी,

▪️स्वा.सैनिक शिवशंकर बप्पा घोंगडे पत्रकारिता पुरस्कार – राजेंद्र  यादव सांगोला,

▪️स्व.गणेश घोगरे ग्रामीण पत्रकारिता पुरस्कार – निळकंठ कांबळे उमरगा

▪️स्वा. सै.स्व. शकुंतला  देशपांडे समाज सेवा पुरस्कार – शहाजी चव्हाण यांची तळजाई प्रतिष्ठान,

▪️रा. ई. काकडे  शोध पत्रकारिता पुरस्कार – शिरीष रणदिवे पुणे,

▪️स्व. सुधाकर सावळे उत्कृष्ट पत्रकार संघ पुरस्कार   – येरमाळा पत्रकार संघ येरमाळा, स्व.के.ए.जोशी आदर्श शिक्षक पुरस्कार ..अनिल शिंदे क्रीडा शिक्षक, यांना पत्रकार संघाचे अध्यक्ष अशोक शिंदे यांनी जाहीर केले.

फेब्रुवारीत होणाऱ्या कार्यक्रमात हे पुरस्कार देण्यात येणार आहेत.पत्रकार संघाच्या वतीने सर्वांचे अभिनंदन करण्यात आले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here