सांगोला (प्रतिनिधी )- गुंफण अकादमी कराड, यांच्या “गुंफण सामाजिक पुरस्काराने” आपुलकी प्रतिष्ठानला मान्यवरांच्या हस्ते पुणे येथे सन्मानित करण्यात आले.

सातारा जिल्ह्यातील गुंफण अकादमीच्या वतीने साहित्य, सामाजिक, सांस्कृतिक, सहकार, उद्योग, शिक्षण आदी विविध क्षेत्रातील उल्लेखनीय कामगिरीसाठी देण्यात येणाऱ्या गुंफण पुरस्कारांचे वितरण पुणे येथे संपन्न झालेल्या २१ व्या गुंफण सद्भावना साहित्य संमेलनात रविवारी १५ फेब्रुवारी रोजी करण्यात आले.

संमेलनाध्यक्ष गझलकार सुनंदा शेळके, भारती विद्यापीठ, पुणेचे सह-कार्यवाह डॉ. महादेव सगरे, सेवानिवृत्त जिल्हा न्यायाधीश सुनील वेदपाठक यांच्या हस्ते व ज्येष्ठ साहित्यिक डॉ. संजय बोरुडे, जेष्ठ ग्रामीण साहित्यिक बबन पोतदार, जयसिंग कळके, गुंफण अकादमी चे अध्यक्ष बसवेश्वर चेणगे, पत्रकार गजानन चेणगे यांच्या उपस्थितीत सन्मानचिन्ह, सन्मानपत्र, शाल, बुके देऊन आपुलकी सदस्यांना गौरविण्यात आले.

यावेळी प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव, सचिव संतोष महिमकर, प्रभाकर सरगर, अच्युत फुले, महादेव दिवटे, सुरेशकाका चौगुले, अरविंद डोंबे, प्रा. बाळासाहेब शेंडे, विठ्ठल मल्टीस्टेटचे चेअरमन दीपक बंदरे, विश्वासराव पाटील, दत्तात्रय नवले, श्रीकांतकाका देशपांडे, वसंत सुपेकर, प्रथमेश यादव, जितेंद्र बोत्रे, श्रीयश नवले आदी उपस्थित होते.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



