वाढेगांवच्या नदीत सापडला १२ किलो वजनाचा चंदेरी मासा

0

वाढेगांव (प्रतिनिधी):  – वाढेगांव ता. सांगोला येथील को. प. बंधाऱ्याच्या नदीपात्रातील पाण्यामध्ये चंदेरी जातीचा १२ किलो वजनाचा मासा सापडला आहे. हा मासा पाहण्यासाठी नागरिकांची मोठी गर्दी झाली होती. वाढेगांव येथे माण, कोरडा व अफ्रका या तीन नद्या असून जिथे या नद्या मिळतात, तिथे को. प. बंधारा आहे. तेथील पात्र खोल व रुंद आहे.

गेल्या वर्षी मोठ्या प्रमाणात पाऊस पडल्याने उन्हाळ्यातच नदीला पाणी आले होते. येणारे पाणी हे दूरवरून आल्याने नदीपात्रात मासेही मोठ्या प्रमाणात आले होते. नदीपात्र स्वच्छ असल्याने या ठिकाणी रव, गासकापर, निरगील, कटला, सपरनेस, गुगळी, कटरना, चिलाप इ. विविध जातीचे मासे नदीपात्रात आढळतात. सध्या नदीपत्रातील पाणी पातळी कमी होत चालली असल्याने मोठ-मोठे मासे पहावयास मिळत आहेत. अशातच शुक्रवारी सकाळी नदीपत्रातील जाळी काढत असताना मोठ्या वजनाचा मासा जाळीत अडकल्याचे लक्षात येताच मासेमारी करणाऱ्यांनी हा मासा नदीपात्रातून बाहेर काढला.

मासेमारी करणारे रोज सकाळी-सायंकाळी जाळीद्वारे मासे काढून विक्रीसाठी ठेवतात. ताजे मासे घेण्यासाठी ग्राहकांची मोठी गर्दी होत असते. मासेमारीच्या छोट्या व्यवसायातून उदरनिर्वाह होत असल्याने मासे व्यवसाईकतून समाधान व्यक्त होत आहे. चंदेरी जातीचा एवढ्या मोठ्या वजनाचा मासा पहिल्यांदाच नदीपात्रात सापडला असल्याचे मच्छीमाऱ्याकडून सांगण्यात आले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here