सांगोला (प्रतिनिधी): ग्रामीण भागातील रुग्णांना अत्यल्प दरात आणि दर्जेदार आरोग्य सेवा मिळावी, या उद्देशाने सांगोला येथील प्रसिद्ध ‘खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटल’ सामाजिक बांधिलकी जपत आहे. या हॉस्पिटलच्या वतीने महिन्याच्या प्रत्येक १५ तारखेला ‘मोफत सर्वरोगनिदान शिबिराचे’ आयोजन करण्यात येत असून, विविध शासकीय योजनांच्या माध्यमातून रुग्णांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया केल्या जात असल्याची माहिती डॉ. परेश खंडागळे यांनी दिली आहे.

समाजात स्त्री-पुरुष समानता रुजावी आणि मुलींच्या जन्माचे स्वागत व्हावे, यासाठी खंडागळे हॉस्पिटलने एक अत्यंत क्रांतिकारी निर्णय घेतला आहे. हॉस्पिटलमध्ये जर नॉर्मल डिलिव्हरी (नैसर्गिक प्रसूती) द्वारे मुलगी झाली, तर त्या बाळंतपणाचे संपूर्ण बिल माफ केले जाते. या उपक्रमाचे सांगोला परिसरातील सर्व स्तरांतून कौतुक होत आहे.

आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकातील रुग्णांना पैशाअभावी उपचार घेण्यापासून वंचित राहावे लागू नये, यासाठी येथे महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना (MJPJAY), आयुष्यमान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना, मुख्यमंत्री सहायता निधी: या अंतर्गत गरजू रुग्णांवर मोफत उपचार व शस्त्रक्रिया केल्या जातात. बांधकाम कामगार योजना: नोंदणीकृत बांधकाम कामगारांसाठी मोफत उपचार व शस्त्रक्रियेची विशेष सोय.ESIC योजना आणि कॅशलेस सुविधा: सर्व प्रमुख इन्शुरन्स कंपन्यांच्या ‘कॅशलेस’ सुविधा येथे उपलब्ध आहेत.

कडलास रोडवर स्थित असलेल्या या हॉस्पिटलमध्ये अनुभवी व तज्ज्ञ डॉक्टरांची टीम २४ तास कार्यरत आहे. अनुभवी डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली अद्ययावत उपकरणांच्या सहाय्याने येथे उपचार केले जातात. केवळ उपचारच नव्हे, तर रुग्णांना मिळणारी आत्मीयता आणि सेवेमुळे खंडागळे हॉस्पिटल हे सांगोल्यातील विश्वासाचे केंद्र बनले आहे.
महिन्याच्या प्रत्येक १५ तारखेला होणाऱ्या मोफत शिबिराचा लाभ सांगोला तालुका आणि परिसरातील जास्तीत जास्त रुग्णांनी घ्यावा, अधिक माहितीसाठी ७५८८५०६१९७ / ९६८९९८९०९० या नंबर वर संपर्क करावा असे आवाहन डॉ. परेश खंडागळे यांनी केले आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



