आलदर लहान मुलांचे हॉस्पिटलचा सामाजिक उपक्रम; पुजारवाडीत मोफत आरोग्य शिबिर

0

सांगोला (प्रतिनिधी): आलदर लहान मुलांचे हॉस्पिटल, सांगोला यांच्या वतीने शनिवार, दिनांक ३१ ऑक्टोबर २०२६ रोजी पुजारवाडी येथे मोफत बालआरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, पुजारवाडी येथे सकाळी १० ते दुपारी १२ या वेळेत हे शिबिर पार पडणार आहे.

या शिबिरात बालरोगतज्ज्ञ डॉ. महावीर आलदर (एम.डी., बालरोगतज्ज्ञ) हे लहान मुलांच्या आरोग्याबाबत पालकांना मार्गदर्शन करणार आहेत. बालकांचे आरोग्य, योग्य पोषण आणि निरोगी भविष्य याबाबत जनजागृती करणे हा या शिबिराचा मुख्य उद्देश आहे.

शिबिरामध्ये बालरोगांबाबत विशेष मार्गदर्शन, लसीकरणाचे महत्त्व व त्याचे वेळापत्रक, नवजात शिशूंची काळजी, बालकांचा योग्य आहार व पोषण, सामान्य आजार आणि त्यावरील घरगुती उपाय, तसेच बालकांची वाढ व विकास या विषयांवर माहिती दिली जाणार आहे.

याशिवाय, महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व प्रधानमंत्री जन आरोग्य योजना (आयुष्मान भारत) यांविषयीही नागरिकांना माहिती मिळणार आहे. पात्र लाभार्थ्यांना नियमानुसार मोफत शस्त्रक्रिया व औषधोपचारांच्या सुविधांबाबत मार्गदर्शन केले जाणार आहे.

आपल्या मुलांचे आरोग्य जपण्यासाठी पालकांनी या मोफत आरोग्य शिबिराचा लाभ घ्यावा, असे आवाहन आलदर लहान मुलांचे हॉस्पिटल, सांगोला यांच्या वतीने करण्यात आले आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here