खिलारवाडीचे सुपुत्र निमिष काळेल यांची क्रिकेट संघामध्ये फेरनिवड

0

सांगोला (प्रतिनिधी): सोलापूर जिल्हा क्रिकेट असोशियनच्या झालेल्या नुकत्याच 14 वर्षे खालील गटांमध्ये खिलारवाडी ता.सांगोला येथील सुपुत्र निमिष नवनाथ काळेल याची सलग दुसऱ्या वर्षी महाराष्ट्र क्रिकेट असोसिएशनच्या वतीने घेण्यात आलेल्या निवड चाचणी मध्ये निवड करण्यात आली आहे. याबद्दल सर्वत्र त्याचे कौतुक होत आहे.

याबद्दल महाराष्ट्राचे माजी मुख्यमंत्री मा.सुशील कुमार शिंदे, खा. धैर्यशील मोहिते पाटील तसेच जिल्हा क्रिकेट असोसिएशनचे सचिव मा. चंदू रेम्बोसू चेअरमन मा.राजेंद्र गोटे सदस्य मा. सत्यजित जाधव व विक्रांत पवार नगरसेवक मा.बिजू अण्णा प्रधाने, नगरसेवक चेतन नरोटे तसेच सोलापूर शहर चे पोलीस कमिशनर माननीय यम राजकुमार यांनी अभिनंदन केले आहे.

निमिष हा सोलापूर जिल्हा लेबर फेडरेशनचे माजी चेअरमन स्व.बाबासाहेब करांडे यांचे नातू व रयत शिक्षण संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय माढा येथील राज्यशास्त्र विभाग प्रमुख प्रो.डॉ. दत्तात्रय काळेल यांचा पुतण्या आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here