सांगोला (प्रतिनिधी): सांगोल्यातील शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्या वतीने जोगेश्वरीचे (पूर्व) खासदार रवींद्र वायकर यांना रेल्वे मागण्यांचे निवेदन देण्यात आले.

संघटनेचे पदाधिकारी सेवानिवृत्त पोलिस निरीक्षक ( लोहमार्ग) हरी बाबर साहेब (आलेगाव) यांनी समक्ष मुंबईतील कार्यालयात भेट देऊन निवेदन देऊन सविस्तर चर्चा केली.

या निवेदनामध्ये 11027 & 11028 दादर –सातारा–दादर रेल्वे दररोज सुरू करण्यात यावी, सांगोला–पंढरपूर– शेगाव (गजानन महाराज मंदिर) रेल्वे सेवा सुरू करावी त्यामुळे विदर्भातील पंढरी व पश्चिम महाराष्ट्रातील पंढरी याची संयुक्तीता वाढून भावी भक्तांचे सोय होईल, व दि 26 एप्रिल रोजी दादर येथे होणाऱ्या रेल्वे परिषदेचे निमंत्रणही देण्यात आल्याची माहिती संस्थापक निलकंठ शिंदे सर यांनी दिली.

दिलेल्या निवेदनावर तत्काळ कार्यवाही करिता रेल्वे प्रशासनाकडे पत्रव्यवहार करून पाठपुरावा करणार असल्याचे आश्वासन खासदार रवींद्र वायकर यांनी अशोक कामटे संघटनेच्या पदाधिकाऱ्यांना दिले यावेळी अशोक कामटे संघटनेचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.


सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



