राज्यातील महाराष्ट्र बोर्डाच्या दहावीच्या विद्यार्थ्यांसाठी मोठी बातमी आहे. दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या जाहीर केला जाणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत फेब्रुवारी-मार्च 2026 मध्ये घेण्यात आलेल्या

माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेचा निकाल उद्या जाहीर होणार आहे. शुक्रवार दिनांक 08 मे 2026 रोजी दुपारी 01.00 वाजता निकाल ऑनलाईन पद्धतीनं जाहीर करण्यात येणार आहे.महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत निकाल जाहीर करण्यापूर्वी सकाळी अकरा वाजता पत्रकार परिषद देखील घेतली जाणार आहे.

महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाकडून घेण्यात आलेल्या दहावीच्या परीक्षेचा निकाल उद्या म्हणजेच ८ मे रोजी दुपारी १ वाजता ऑनलाईन जाहीर होणार आहे. महाराष्ट्र राज्य माध्यमिक व

उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये घेण्यात आलेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.10 वी) परीक्षेचा निकाल उद्या जाहीर केला जाणार आहे.

फेब्रुवारी-मार्च २०२६ मध्ये झालेल्या माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र अर्थात इयत्ता दहावी परीक्षेचा निकाल विद्यार्थ्यांना ऑनलाईन पाहता येणार आहे. निकालाबाबतची अधिकृत वार्ताहर परिषद उद्या सकाळी ११ वाजता राज्य मंडळ कार्यालयात होणार आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक


