संत बाळूमामा पालखी सोहळ्यानिमित्त झापाचीवाडी येथे आलदर हॉस्पिटलच्या वतीने भव्य मोफत बालआरोग्य शिबिराचे आयोजन

0

सांगोला (प्रतिनिधी): श्री संत बाळूमामा पायी पालखी सोहळ्याचे औचित्य साधून झापाचीवाडी (उदनवाडी) येथे आलदर लहान मुलांचे हॉस्पिटल व ग्रामस्थ यांच्या संयुक्त विद्यमाने भव्य मोफत आरोग्य शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. हे शिबीर मंगळवारी, १४ मे २०२६ रोजी जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, झापाचीवाडी येथे संपन्न होणार आहे.

ग्रामीण भागातील मुलांच्या आरोग्याला प्राधान्य देण्यासाठी या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे. यामध्ये नवजात बालकापासून ते १८ वर्षांपर्यंतच्या सर्व मुलांची तज्ज्ञ डॉक्टरांकडून मोफत आरोग्य तपासणी केली जाईल. तसेच, शिबिरात येणाऱ्या गरजू रुग्णांना मोफत औषधांचे वाटप देखील केले जाणार आहे.

हे शिबीर केवळ तपासणीपुरते मर्यादित नसून, गंभीर आजार असलेल्या बालकांसाठी महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना आणि प्रधानमंत्री आयुष्मान भारत योजना अंतर्गत पात्र रुग्णांवर मोफत शस्त्रक्रिया आणि उच्च दर्जाचे उपचार केले जातील.

शासकीय योजनांचा लाभ घेण्यासाठी आयुष्मान कार्ड अत्यंत आवश्यक आहे. अनेक नागरिकांकडे हे कार्ड नसल्यामुळे उपचारांत अडचणी येतात. ही बाब लक्षात घेऊन, शिबिराच्या ठिकाणीच नागरिकांना मोफत आयुष्मान कार्ड काढून दिले जाणार आहे. त्यासाठी पालकांनी खालील कागदपत्रे सोबत आणणे अनिवार्य आहे:

१. ऑनलाइन रेशनकार्ड (१२ अंकी नंबर असलेले)

२. आधार कार्ड

झापाचीवाडी येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत सकाळी ११:०० ते दुपारी १:०० या वेळेत हे शिबीर पार पडणार आहे. तरी परिसरातील पालकांनी, विशेषतः वाड्या-वस्त्यांवरील नागरिकांनी आपल्या मुलांच्या आरोग्य तपासणीसाठी या शिबिराचा मोठ्या संख्येने लाभ घ्यावा, असे आवाहन ‘आलदर लहान मुलांचे हॉस्पिटल’ आणि आयोजन समितीच्या वतीने करण्यात आले आहे. अधिक माहितीसाठी ९०२९० ४४००९ या क्रमांकावर संपर्क करावा असे आवाहन आयोजकांनी केले आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here