निकाल बोलतोय गुणवत्तेचा; सक्सेस क्लासेसमध्ये प्रवेश सुरू”

0

सांगोला (प्रतिनिधी) :फेब्रुवारी २०२६ मध्ये झालेल्या इयत्ता १० वीच्या CBSE बोर्ड परीक्षेत सांगोला तालुक्यातील नामांकित सक्सेस क्लासेसच्या विद्यार्थ्यांनी उल्लेखनीय यश संपादन करत पुन्हा एकदा गुणवत्तेची परंपरा कायम राखली आहे. यामध्ये कु. हर्षद दत्तात्रय गायकवाड यांनी ९८.४० टक्के गुण मिळवत तालुक्यात प्रथम क्रमांक पटकावून संस्थेच्या यशात मानाचा तुरा रोवला आहे.

“वातावरण बदललं की भविष्य बदलतं” या विचारावर आधारित सक्सेस क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांना केवळ अभ्यासाचे मार्गदर्शन दिले जात नाही, तर त्यांना प्रेरणादायी, शिस्तबद्ध आणि सकारात्मक शैक्षणिक वातावरण उपलब्ध करून दिले जाते. याच वातावरणामुळे विद्यार्थ्यांमध्ये आत्मविश्वास, जिद्द आणि यशाची उर्मी निर्माण होत असून अनेक विद्यार्थी उज्ज्वल यश संपादन करत आहेत.

सक्सेस क्लासेसमध्ये विद्यार्थ्यांसाठी आधुनिक वातानुकूलित वर्गखोल्या, स्वतंत्र वातानुकूलित अभ्यासिका, अनुभवी व पात्र शिक्षकवर्ग, नियमित चाचणी मालिका, शंका निरसन सत्रे, वैयक्तिक मार्गदर्शन आणि सर्वांगीण विकासासाठी विविध उपक्रम राबवले जातात. येथे विद्यार्थ्यांच्या केवळ गुणांवर नव्हे, तर त्यांच्या व्यक्तिमत्त्व विकास, शिस्त, आत्मविश्वास आणि करिअर घडवण्यावरही विशेष भर दिला जातो.

विशेष म्हणजे, विद्यार्थ्यांना अधिक मेहनतीसाठी प्रोत्साहन देण्यासाठी संस्थेत एक अभिनव योजना राबविण्यात येते. कोणत्याही विषयात १०० पैकी १०० गुण मिळवणाऱ्या विद्यार्थ्याला त्या विषयाची संपूर्ण फी परत केली जाते. या उपक्रमामुळे विद्यार्थ्यांमध्ये स्पर्धात्मकता, सातत्य आणि उत्कृष्टतेची प्रेरणा निर्माण होत आहे.

हर्षद गायकवाड यांच्या उल्लेखनीय यशाबद्दल सक्सेस क्लास कडून त्यांचा गौरव करण्यात आला असून साहित्य स्वरूपातील पुस्तके आणि ₹२५,००० चे रोख पारितोषिक प्रदान करण्यात आले. या यशाबद्दल सक्सेस क्लासेसचे संचालक मयूर महामुनी सर यांनी विद्यार्थ्याचे अभिनंदन करत सांगितले की, “विद्यार्थ्यांचे यश हेच आमचे खरे यश आहे. आम्ही केवळ शिक्षण देत नाही, तर विद्यार्थ्यांचे उज्ज्वल भविष्य घडवण्याचे कार्य करत आहोत.”

दरम्यान, इयत्ता ११ वी विज्ञान प्रवेश प्रक्रिया आता सुरू झाली असून NEET, JEE, MHT-CET तसेच बोर्ड परीक्षांसाठी मर्यादित जागांवर प्रवेश सुरू आहेत. गुणवत्तापूर्ण शिक्षण, शिस्तबद्ध वातावरण आणि सातत्यपूर्ण निकालांची परंपरा अनुभवण्यासाठी पालक व विद्यार्थ्यांनी लवकरात लवकर प्रवेश निश्चित करावा, असे आवाहन संस्थेतर्फे करण्यात आले आहे.

गेल्या अनेक वर्षांपासून सांगोला तालुक्यात गुणवत्ता, विश्वास आणि सातत्यपूर्ण यश यांचे प्रतीक बनलेल्या सक्सेस क्लासेसने पुन्हा एकदा आपला शैक्षणिक दबदबा सिद्ध केला आहे.

“फक्त शिक्षण नाही… उज्ज्वल भविष्य घडवण्याची जबाबदारी!”

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here