श्लोक देशमुख राज्य गुणवत्ता यादीत; बार्शी येथे मंथन राज्यस्तरीय सामान्यज्ञान परीक्षेचा पारितोषिक वितरण समारंभ संपन्न

0

कोळा (प्रतिनिधी ): सांगोला तालुक्यातील कोळा विद्या मंदिर इंग्लिश मेडीयम स्कूल, कोळा मधील इयत्ता दुसरी मधील श्लोक विनोद देशमुख 150 पैकी 148 गुण मिळवून राज्यात दुसरा क्रमांक मिळवून यश प्राप्त केले.

यावेळी मंथन वेलफेअर फाउंडेशन संचलित, मंथन राज्यस्तरीय सामान्य ज्ञान परीक्षा 2026 चा बक्षीस वितरण समारंभ बार्शी येथील माऊली लॉन्स & मंगल कार्यलय आज रविवार 5 जुलै रोजी संपन्न झाला. मंथन परीक्षेत राज्य, जिल्हा, विभाग तालुका गुणवत्ता यादीमध्ये मिळवलेल्या मुलांचा यावेळी सत्कार मान्यवरांच्या हस्ते करण्यात आला.

या कार्यक्रमांस सहाय्यक संचालक इतर मागास बहुजन कल्याण धाराशिव अमोल ताकभाते, निरीक्षक सार्वजनिक न्याय नोंदणी कार्यालय धर्मादाय उपायुक्तालय सोलापूर उमेश देशमुख, कार्यक्रमाचे अध्यक्ष प्रशासन अधिकारी शिक्षण मंडळ बार्शी व कुर्डूवाडी अनिल बनसोडे, प्रमुख उपस्थिती लार्सन अँड टुबो (L&T) दुबई (UAE) रवीकरण रणसुभे, समन्वयक साई हेल्थ फाउंडेशन पुणे शिल्पा राजपूत, सहाय्यक आयुक्त पशुसंवर्धन व दुग्ध व्यवसाय विभाग बार्शी डॉ. राहुल गोसावी, राज्य कर निरीक्षक बार्शी संतोष जाधव, सहाय्यक आरोग्य विभाग धाराशिव विनोद काटे, तालुका क्रीडा अधिकारी सातारा सचिन रणदिवे, वनपरिक्षेत्र अधिकारी कळंब वैजनाथ कुटे, मॅनेजर युनियन बँक ऑफ इंडिया बार्शी गणेश शिंदे, विनोदी व ग्रामीण कवी सुनील जवंजाळ सर, समाधान केदार सर आदी मान्यवरांच्या उपस्थिती मध्ये पार पडला.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here