“संमतीशिवाय स्मार्ट मीटर बसवल्याचा आरोप; ड्रीम सिटी गृहनिर्माण संस्थेची महावितरणकडे धाव”

0

सांगोला (प्रतिनिधी):सांगोला येथील एखतपुर रोडवरील ड्रीम सिटी सहकारी गृहनिर्माण संस्था मर्यादितच्या सदस्यांनी त्यांच्या संमतीशिवाय जुन्या वीज मीटरऐवजी स्मार्ट मीटर बसविण्यात आल्याचा आरोप करत महावितरणकडे लेखी तक्रार दाखल केली आहे.

‘द जर्नलिस्ट असोसिएशन’ या राष्ट्रीय पत्रकार संघटनेच्या माध्यमातून महावितरणच्या सांगोला कार्यालयातील अभियंत्यांना निवेदन देण्यात आले. निवेदनात संस्थेच्या सदस्य व रहिवाशांच्या संमतीशिवाय विभागातील कर्मचाऱ्यांनी जुने मीटर काढून स्मार्ट मीटर बसविले असल्याचे नमूद करण्यात आले आहे.

तसेच, बसविण्यात आलेले स्मार्ट मीटर दोषपूर्ण असल्याचा दावा करत या प्रकरणाची तातडीने चौकशी करून योग्य ती कार्यवाही करावी, अशी मागणी संस्थेच्या वतीने करण्यात आली. अभियंता हणमंत बनसोडे यांनी निवेदकांना समाधानकारक उत्तर दिले नसलेमुळे निवेदकांनी पुढील कायदेशीर मार्गाने जाणेचा निर्णय घेतला. यावेळी द जर्नलिस्ट असोसिएशन चे स्वतंत्र पत्रकार कक्षाचे जिल्हाध्यक्ष भैरवनाथ बुरांडे, पत्रकार प्रशिक्षण कक्षाचे जिल्हाध्यक्ष मिनाज खतीब, विधी कक्षाचे ॲड लक्ष्मीकांत पाचंगे, सचिव तन्वीर मुजावर, सल्लागार अशोक पवार, महिला प्रतिनिधी दिक्षा चंदनशिवे, ड्रिमसिटी सहकारी गृह निर्माण संस्थेचे चेअरमन मोहन बाबर तसेच सर्व पदाधिकारी व सदस्य उपस्थित होते.

विज ग्राहकांना न्याय मिळालाच पाहिजे – ॲड. अयुब पटेल

स्मार्ट मीटरबाबत नागरिकांमध्ये विविध शंका व तक्रारी समोर येत असून स्मार्ट मिटर बसवताना बेकायदेशीर कृत्य घडले असलेस महावितरण प्रशासनाने या निवेदनाची तातडीने गंभीर दखल घेऊन संबंधित प्रकरणाची सखोल तपासणी करावी व संबंधीतांवर कायदेशीर कारवाई करावी अशी अपेक्षा राष्ट्रीय पत्रकार संघटनेचे कायदेशीर विभागाचे राष्ट्रीय सरचिटणीस ॲड अयुब पटेल यांनी महावितरण प्रशासनाकडे व्यक्त केली.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here