माणगंगा परिवार अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीच्या हातीद शाखेचा प्रथम वर्धापन दिन उत्साहात संपन्न

0

हातीद (प्रतिनिधी): माणगंगा परिवार अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटी लि., हातीद शाखेचा प्रथम वर्धापन दिन भक्तिमय व उत्साहपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. यानिमित्त शाखेमध्ये श्री सत्यनारायण महापूजेचे आयोजन करण्यात आले होते. तसेच सर्व सभासद, खातेदार, ठेवीदार व हितचिंतकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते.या कार्यक्रमाला हातीद, पाचेगाव, बुध्याल, जुणोनी, नलावडेवाडी, मिसाळवाडी, उदनवाडी, जुजारपूर, मंगेवाडी, राजुरी, माणेवाडी तसेच परिसरातील इतर गावांतील सभासद, खातेदार, ठेवीदार आणि नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मोठ्या संख्येने उपस्थिती दर्शविली. उपस्थित सर्व सभासद, खातेदार व मान्यवरांचा गुलाबपुष्प देऊन सन्मान करण्यात आला.

अवघ्या एका वर्षाच्या कालावधीत हातीद शाखेने आपल्या पारदर्शक, विश्वासार्ह आणि ग्राहकाभिमुख सेवेमुळे कार्यक्षेत्रात वेगळी ओळख निर्माण केली आहे. शाखेने अल्पावधीतच ₹२ कोटींपेक्षा अधिक ठेवींचा टप्पा गाठत उल्लेखनीय प्रगती साधली असून, ४५० हून अधिक बचत खातेदारांना विविध बँकिंग व आर्थिक सेवा प्रदान केल्या जात आहेत. शेतकरी, व्यापारी, महिला, युवक, ज्येष्ठ नागरिक तसेच सर्वसामान्य नागरिकांना जलद, सुरक्षित आणि विश्वासार्ह आर्थिक सेवा उपलब्ध करून देत शाखेने लोकांचा दृढ विश्वास संपादन केला आहे. त्यामुळे उपस्थित सभासदांनी संस्थेच्या प्रामाणिक, पारदर्शक आणि सेवाभावी कार्यपद्धतीचे मनापासून कौतुक केले.

यावेळी उपस्थित सभासदांनी माणगंगा परिवार अर्बन को-ऑपरेटिव्ह क्रेडिट सोसायटीने भविष्यातही याच विश्वासाने, पारदर्शकतेने आणि सेवाभावाने कार्य करत ग्रामीण भागातील आर्थिक विकासात महत्त्वाची भूमिका बजावत अधिकाधिक नागरिकांपर्यंत आर्थिक सेवा पोहोचवाव्यात, अशी अपेक्षा व्यक्त केली.

कार्यक्रमाच्या यशस्वी आयोजनासाठी शाखेचे अधिकारी, कर्मचारी, सभासद, खातेदार तसेच हातीद, पाचेगाव, बुध्याल, जुणोनी, नलावडेवाडी, मिसाळवाडी, उदनवाडी, जुजारपूर, मंगेवाडी, राजुरी, माणेवाडी व परिसरातील सर्व नागरिकांनी दिलेल्या सहकार्याबद्दल शाखेच्या वतीने मनःपूर्वक आभार व्यक्त करण्यात आले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here