सोनम वांगचुक व विद्यार्थ्यांच्या उपोषणास सांगोला तालुक्यातून जाहीर पाठिंबा

0

सांगोला (शशी हातेकर):दिल्ली येथील जंतर-मंतरवर सामाजिक कार्यकर्ते सोनम वांगचुक आणि विद्यार्थ्यांनी विविध जनहितार्थ मागण्यांसाठी सुरू केलेल्या उपोषणास सांगोला तालुक्यातील तमाम नागरिकांच्या वतीने जाहीर व नैतिक पाठिंबा व्यक्त करण्यात आला आहे. या संदर्भात सांगोला तहसील कार्यालयामध्ये तहसीलदारांना निवेदन सादर करून शासनाने तात्काळ योग्य पावले उचलावीत, अशी ठाम मागणी करण्यात आली.

सोनम वांगचुक व विद्यार्थ्यांनी उपस्थित केलेले प्रश्न हे अत्यंत गंभीर व सर्वसामान्य नागरिकांशी निगडित आहेत. विशेषतः शैक्षणिक क्षेत्रातील पेपर फुटीचे वाढते प्रकार आणि त्यामुळे लाखो विद्यार्थ्यांचे होणारे अतोनात नुकसान, पर्यावरणाचे संरक्षण, नागरिकांचे संविधानिक हक्क तसेच लोकशाही मूल्यांचे जतन या महत्त्वाच्या मुद्द्यांवर हे आंदोलन सुरू आहे. शासनाने या मागण्यांची तातडीने व सकारात्मक दखल घेऊन न्याय्य तोडगा काढावा, असे निवेदनात नमूद करण्यात आले आहे.

“हा लढा केवळ एका व्यक्तीचा नसून, देशातील विद्यार्थ्यांचे भविष्य, संविधानिक अधिकार आणि लोकशाही मूल्यांच्या संरक्षणासाठी आहे. लोकशाही व्यवस्थेत शांततापूर्ण व अहिंसक मार्गाने आंदोलन करण्याचा अधिकार प्रत्येकाला आहे.”

सांगोला नागरिक प्रतिनिधी

सांगोला तालुक्यातील सर्वपक्षीय व सामाजिक स्तरातील नागरिकांनी तहसील कार्यालय परिसरात एकत्र येत आंदोलनाला पूर्ण पाठिंबा दर्शवला. शासनाने या विषयात त्वरित संवेदनशीलता दाखवून सकारात्मक कार्यवाही करावी, अशी मागणी यावेळी उपस्थित नागरिकांनी केली आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here