स्वातंत्र्य महोत्सवानिमित्त ‘माणगंगा ॲग्रो मार्ट’ची भव्य शेतकरी लकी ड्रॉ योजना; प्रथम पारितोषिक ट्रॅक्टर
सांगोला (प्रतिनिधी):- स्वातंत्र्य महोत्सवानिमित्त कडलास नाका, पंढरपूर रोड, सांगोला येथील माणगंगा अॅग्रो मार्टच्या वतीने ‘शेतकरी लकी ड्रॉ योजना २०२६’ जाहीर करण्यात आली आहे. या योजनेअंतर्गत शेतकऱ्यांना खरेदीसोबत थेट ट्रॅक्टर, मोटारसायकल, इलेक्ट्रिक स्कूटर यांसारखी आलिशान व उपयोगी बक्षिसे जिंकण्याची सुवर्णसंधी मिळणार आहे.

स्वातंत्र्य महोत्सवाचे औचित्य साधून शेतकऱ्यांच्या पाठीवर कौतुकाची थाप मारणे आणि त्यांच्या खरेदीला अधिक आनंददायी बनवणे, या उद्देशाने या विशेष योजनेचे आयोजन करण्यात आल्याचे व्यवस्थापनाकडून सांगण्यात आले.

या लकी ड्रॉमध्ये प्रथम पारितोषिक म्हणून १ ट्रॅक्टर, द्वितीय २ शाईन मोटारसायकली, तृतीय ३ इलेक्ट्रिक स्कूटर, चतुर्थ ४ फ्रीज, पाचवे वॉशिंग मशीन पाच, सहावे एलईडी टीव्ही ६, सातवे ७ फूट x १० फूट आकाराची ताडपत्री, आठवे पेट्रोल स्प्रे पंप ८, नववे स्प्रे पंप ९, तर दहावे पारितोषिक म्हणून १७ फूट X २४ फूट आकाराची ताडपत्री देण्यात येणार आहे. याशिवाय खरेदीदारांसाठी हमखास भेटीचीही योजना ठेवण्यात आली आहे. ३ हजार रुपये किंवा त्यापेक्षा अधिक खरेदीवर ४०० रुपये किमतीची हमखास भेट देण्यात येणार असून, ७हजार ५०० रुपये किंवा त्यापेक्षा अधिक खरेदीवर १ हजार ५०० रुपये किमतीची हमखास भेट मिळणार आहे. तसेच लकी ड्रॉ कूपन ही काढण्यात येणार आहेत. माणगंगा ग्रो मार्टमध्ये शेतकऱ्यांसाठी विविध कृषी साहित्य व उपकरणांची उपलब्धता असून, स्वातंत्र्य महोत्सवानिमित्त सुरू करण्यात आलेल्या या योजनेमुळे शेतकऱ्यांमध्ये उत्साहाचे वातावरण निर्माण झाले आहे. अधिक माहितीसाठी माणगंगा अॅग्रो मार्ट, कडलास नाका, पंढरपूर रोड, सांगोला येथे संपर्क साधता येईल.

योजनेच्या नियम व अटींनुसार रोख, कूपन, यूपीआय, बँक ट्रान्सफर अशा विविध प्रकारच्या पेमेंटवर योजना लागू आहे.कूपन फक्त खरेदी करणाऱ्या ग्राहकाच्या नावावरच असेल. कंपनीचा निर्णय अंतिम व बंधनकारक राहणार असल्याचेही स्पष्ट करण्यात आले आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



