पात्र लाभार्थ्यांनी आवश्यक कागदपत्रांसह सहभागी होण्याचे आवाहन
सांगोला (प्रतिनिधी): युवानेते इन्नुस नदाफ यांच्या वाढदिवसानिमित्त सांगोला शहरात नागरिकांसाठी भव्य आयुष्मान भारत कार्ड कॅम्पचे आयोजन करण्यात आले आहे. आर्थिकदृष्ट्या दुर्बल व गरजू कुटुंबांना दर्जेदार आरोग्यसेवा उपलब्ध व्हावी, तसेच पात्र नागरिकांना आयुष्मान भारत योजनेचा लाभ सहज मिळावा, या उद्देशाने या शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

आयुष्मान भारत योजनेअंतर्गत पात्र लाभार्थ्यांना दरवर्षी कुटुंबासाठी ५ लाख रुपयांपर्यंतच्या आरोग्य उपचारांचा लाभ मिळू शकतो. देशभरातील योजनेशी संलग्न सरकारी तसेच खासगी रुग्णालयांमध्ये उपचाराची सुविधा उपलब्ध आहे. कुटुंबातील पात्र सदस्यांना या योजनेचा लाभ घेता येत असून, उपचाराच्या वेळी कॅशलेस व पेपरलेस सुविधेचा लाभ मिळतो. गंभीर आजारांसह विविध प्रकारच्या उपचारांसाठी या योजनेचा उपयोग होऊ शकतो.

आरोग्यावरील वाढता खर्च लक्षात घेता, गरीब व मध्यमवर्गीय कुटुंबांसाठी आयुष्मान भारत कार्ड हे महत्त्वाचे ठरत आहे. त्यामुळे अद्याप आयुष्मान भारत कार्ड काढले नसलेल्या पात्र नागरिकांनी या कॅम्पचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांकडून करण्यात आले आहे.

आयुष्मान भारत कार्ड काढण्यासाठी नागरिकांनी आधार कार्ड, आधार कार्डला लिंक असलेला मोबाईल नंबर, रेशन कार्ड, पॅन कार्ड (असल्यास), पासपोर्ट साईज फोटो तसेच आवश्यकतेनुसार इतर कागदपत्रे सोबत आणावीत. कागदपत्रांची पूर्तता असल्यास कार्ड काढण्याची प्रक्रिया अधिक सुलभ होण्यास मदत होणार आहे.

हा भव्य आयुष्मान भारत कार्ड कॅम्प न्यू इंग्लिश स्कूल ग्राउंड शेजारी, आदर्श बालक मंदिर, सांगोला येथे आयोजित करण्यात आला आहे. परिसरातील पात्र नागरिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहून या आरोग्यविषयक सुविधेचा लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.अधिक माहितीसाठी 95611 58686 या क्रमांकावर संपर्क करावा.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



