ठळक बातम्या – 15/08/2026

0

✒️ पुन्हा ऑपरेशन टायगर?

▪️आमदार कैलास पाटील हे ऑपरेशन टायगरचा दुसरा भाग

▪️मंत्री प्रताप सरनाईकांच्या दाव्यानं खळबळ

✒️ पार्थ पवारांकडून झिशान सिद्दिकी यांना पुन्हा मोठी संधी

▪️वरिष्ठांचा विरोध डावलत सिद्दिकींकडे मुंबई अध्यक्षपद?

✒️ शरद पवारांकडून चुकीच्या पद्धतीनं राष्ट्रवादी काढून घेत निवडणूक आयोगानं अत्याचार केला, शिवसेना उद्धव ठाकरेंचीच

▪️सुप्रिया सुळेंचा हल्लाबोल

✒️सुप्रियाताई आपलं ठेवायचं झाकून आणि दुसऱ्याच बघायचं वाकून, तुमच्या ताटात काय वाढून ठेवलंय ते बघा

▪️सुळेंच्या टीकेनंतर वाघमारे कडाडल्या

✒️ डॉमिनोजनंतर बर्गर किंगवर ‘FDA’ ची मोठी कारवाई

▪️पुण्यातील कँप शाखेचा परवाना जागेवरच रद्द !

✒️ मनोज जरांगे मानसिकदृष्ट्या विकृत, त्यांच्यावर योग्य संस्कार झालेले नाहीत

▪️भाजप आमदाराचा जोरदार हल्लाबोल

✒️आमदार हिरामण खोसकरांच्या मुलाची शिवसेना तालुकाप्रमुखाला जिवे मारण्याची धमकी, ऑडिओ क्लिप व्हायरल

▪️महायुतीतील वाद चव्हाट्यावर

✒️आदिवासी आश्रमशाळा की ‘मृत्यूचा सापळा’?

▪️ दोन वर्षांत राज्यात तब्बल 584 विद्यार्थ्यांचा मृत्यू; धक्कादायक आकडेवारी समोर

✒️ परतीचा पाऊस बॅकलॉग भरणार, विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचीही चिंता मिटणार

▪️ज्येष्ठ हवामान तज्ञ पंजाबराव डख यांचा अंदाज

✒️ देशात जातनिहाय जनगणना होणार असल्याचं स्पष्ट, जात, धर्म, बँक खातं ते कोरोना लस कुठे घेतली

▪️ नागरिकांना विचारायच्या 40 प्रश्नांची यादी केंद्र सरकराकडून जाहीर

✒️ औद्योगिक महाराष्ट्राचा यशवंतरावांचा वारसा टिकवा, चाकणमध्ये कंपन्या बंद पडल्यावरून शरद पवारांचा मुख्यमंत्र्यांना सल्ला

▪️ बंद झालेल्या 76 टक्के कंपन्या या डिसफंक्शनल, त्या कधीच सुरू झाल्या नाहीत

▪️शरद पवारांना उत्तर देताना देवेंद्र फडणवीस यांनी आकडेवारीच मांडली

✒️ हिंमत असेल तर आमच्यासोबत समोरासमोर संयुक्त प्रेस कॉन्फरन्स घ्या, पुराव्यासकट आणि प्रेझेंटेशनसह महाराष्ट्राची काय झालीय सांगतो

▪️आमदार रोहित पवारांचे उद्योगमंत्री उदय सामंतांना ओपन चॅलेंज

✒️ लाडकी बहीण योजना कधीच बंद होणार नाही, राज्यातील एक कोटी बहिणींना लखपती दीदी करणार

▪️मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांचे आश्वासन

✒️ विद्येचं माहेरघर असलेल्या पुण्यात भोंदूबाबाचा धुमाकूळ

▪️भोंदू उमेश तागुंदेचे पाय धुतलेलं दूध आणि पाणी पितानाचे भक्तांचे व्हिडीओ व्हायरल

✒️ पुण्याच्या चाकण MIDC तील रस्त्यांच्या दुरवस्थेचे आणखी दोन बळी

▪️ चिखलामुळे बाईक स्लीप होऊन कंटेनरच्या चाकाखाली आले, दोघांचा जागीच दुर्दैवी अंत

✒️ अशीच स्थिती राहिल्यास भारत 2047 पर्यंत विकसित होणार नाही

▪️श्रीलंका, बांगलादेशसारख्या देशांनी आधीच मागे टाकलं, योग्य नेतृत्व निवडण्यासाठी देशाला शांततापूर्ण क्रांतीची गरज

▪️पर्यावरण तज्ज्ञ सोनम वांगचूक यांचं वक्तव्य

✒️ ‘आता भारत थांबणार नाही’, राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांचा देशाला संदेश

✒️ चंद्रशेखर बावनकुळेंना लागली लॉटरी

▪️राष्ट्रीय पातळीवर मोठी जबाबदारी

✒️ मी धमक्यांना भीत नाही…, झिशान सिद्दीकी यांचे मोठे विधान

✒️ भारतीय महिला संघाला दुहेरी धक्का

▪️जेमिमा रॉड्रिग्स आशिया कपमधून आऊट

✒️ उद्योग क्षेत्रात महाराष्ट्रच आघाडीवर

▪️३६ हजार कंपन्या बंद झाल्याच्या माहितीचा विपर्यास : मुख्यमंत्र्यांचा दावा

✒️ एमबीबीएस व बीडीएसच्या प्रवेश नोंदणीला मुदतवाढ

✒️ महागाईचा दिलासा

▪️जुलैमध्ये चलनवाढ ९.७८ टक्क्यांखाली

▪️स्वस्त इंधनाने दराचा नऊ महिन्यांचा नीचांक

✒️ स्वातंत्र्य दिनाच्या मुहूर्तावर हॉकी विश्वचषक स्पर्धेला प्रारंभ

✒️ फिरकीपटूंविरुद्ध भारताची कसोटी

▪️गॉल येथे आजपासून श्रीलंकेविरुद्ध पहिला सामना; संघनिवडीचा पेच कायम

✒️ आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या पाठपुराव्यामुळे पुन्हा एकदा सांगोला बस स्थानकास पाच नवीन गाड्या

✒️ सांगोला विद्यामंदिरची सातवी शिष्यवृत्ती परीक्षेत उत्तुंग भरारी

▪️शहरी विभागातील ५२ पैकी ४८ विद्यार्थी सांगोला विद्यामंदिरचे

✒️ सांगोला येथे रविवारी डाळिंब बहार मोफत डाळींबरत्न बी.टी.गोरे सर यांचे मार्गदर्शन तसेच कृषी प्रदर्शन

✒️ सांगोल्यात प्रशासनाच्यावतीने भव्य तिरंगा मोटारसायकल रॅली

✒️ अजनाळे येथील नाभिक समाजमंदिराचा २० वर्षांचा प्रश्न अखेर मार्गी

▪️आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्या पाठपुराव्यामुळे १० लाखांचा निधी मंजूर

✒️ बलवडी येथे हुतात्मा महादेव शिंदे स्मारकाचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांच्या हस्ते अनावरण

▪️हुतात्मा भवनासाठी ५० लाखांचा निधी देणार; पालकमंत्री जयकुमार गोरे यांची घोषणा

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here