वीरशैव श्री’ पुरस्काराबद्दल प्रा. प्रबुद्धचंद्र झपके यांचा सांगोला विद्यामंदिरात भव्य सत्कार

0

सांगोला (प्रतिनिधी): अखिल भारतीय वीरशैव लिंगायत महासभा, बेंगळूरू यांच्या वतीने सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे अध्यक्ष प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांना नुकताच मानाचा ‘वीरशैव श्री’ पुरस्कार प्रदान करण्यात आला. या प्रतिष्ठेच्या पुरस्काराबद्दल सांगोला विद्यामंदिर प्रशाला व ज्युनिअर कॉलेजच्या वतीने प्राचार्य चारूदत्त जगताप यांच्या हस्ते प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांचा शाल,श्रीफळ आणि पुष्पगुच्छ देऊन विशेष सत्कार करण्यात आला.

यावेळी व्यासपीठावर सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळाचे सहसचिव प्रशुद्धचंद्र झपके यांच्यासह प्रशालेचे उपमुख्याध्यापक प्रदीप धुकटे,उपप्राचार्य शिवशंकर तटाळे, पर्यवेक्षक काकासो नरूटे, शुभांगी घोंगडे उपस्थित होते. प्रा.झपके यांचे प्रेरणादायी शैक्षणिक कार्य, वीरशैव लिंगायत समाजासाठीचे विविध पदाच्या माध्यमातून दिलेले योगदान,सामाजिक बांधिलकीने समाजासाठी दिलेले योगदान,लायन्स क्लबच्या माध्यमातून केलेले विविध उपक्रम या सर्वांची दखल घेऊन त्यांना हा ‘वीरशैव श्री’ पुरस्कार देण्यात आला आहे. त्यांच्या या उत्तुंग यशाबद्दल सर्वांच्या वतीने त्यांचा अत्यंत उत्साहात आणि अभिमानाने सन्मान करण्यात आला.या आनंददायी कार्यक्रमासाठी प्रशाला व ज्युनिअर कॉलेजचे शिक्षक आणि शिक्षकेत्तर कर्मचारी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

या सत्कार समारंभाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन प्रा.धनाजी चव्हाण यांनी केले,तर उपप्राचार्य प्रा. शिवशंकर तटाळे यांनी सर्वांचे आभार मानले.

या सत्काराला उत्तर देताना प्रा.प्रबुद्धचंद्र झपके यांनी अत्यंत भावनिक शब्दांत आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, गेली ११७ वर्षे अखंडपणे सुरू असलेल्या संस्थेचा हा पुरस्कार अनेक दिग्गज मान्यवरांच्या उपस्थितीत मिळाला, याचा मला मनस्वी आनंद आहे. शैक्षणिक व सामाजिक कार्य करण्याचा घराण्याचा वसा पुढे चालवण्याची मला संधी मिळाली, हे मी माझे भाग्य समजतो. काम हे पुरस्कार मोजण्यासाठी नसते, तर ते सातत्याने करत राहायचे असते. केवळ पुरस्कारासाठी काम करू नये,

तर निष्काम भावनेने केलेल्या कामामधून जे आत्मिक समाधान मिळते, तोच माणसाचा खरा आणि सर्वोच्च पुरस्कार असतो. आजवर केलेले विविध क्षेत्रांतील कार्य लक्षात घेऊन मला हा पुरस्कार मिळाला असला तरी, हा पुरस्कार माझा एकट्याचा नसून तो आपल्या सर्वांचा आहे. मी केवळ आपला एक प्रतिनिधी म्हणून तो स्वीकारला आहे. अशा कृतज्ञतापूर्ण शब्दांत त्यांनी सर्वांचे धन्यवाद मानले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here