सांगोल्यात वाघमारे सरांच्या कराटे क्लासचे पोलीस वसाहतीत दिमाखदार उद्घाटन; दुसऱ्या पिढीची धडाकेबाज एन्ट्री!

0

सांगोला (प्रतिनिधी): सांगोला येथील पोलीस वसाहतीमध्ये (पोलीस लाईन) वाघमारे सरांच्या नामांकित कराटे क्लासचे अतिशय उत्साहात आणि थाटामाटात उद्घाटन पार पडले. विशेष म्हणजे, या सोहळ्याच्या निमित्ताने वाघमारे सरांच्या कराटे क्लासमध्ये दुसऱ्या पिढीचे आगमन झाल्याचे पाहायला मिळाले.

शनिवारी २२ ऑगस्ट रोजी आयोजित या भव्य सोहळ्यात पोलीस उपनिरीक्षक (PSI) बाबासाहेब भातुंगडे आणि ॲड. साहिल सय्यद यांच्या शुभहस्ते फित कापून क्लासचे उद्घाटन करण्यात आले. सांगोला शहरात ज्या ठिकाणाहून कराटे प्रशिक्षणाची खरी सुरुवात झाली होती, तोच ऐतिहासिक क्लास नव्या रुपात आणि नव्या ऊर्जेने पुन्हा सुरू होत असल्याबद्दल उपस्थितांनी आनंद व्यक्त केला.

आपल्या मनोगतात बोलताना आंतरराष्ट्रीय ख्यातीचे प्रशिक्षक श्री. सुनील वाघमारे सर म्हणाले की, सांगोल्याचे पहिले ब्लॅक बेल्ट आणि याच पोलीस लाईन कराटे क्लासचे माजी विद्यार्थी अविनाश नडविन्केरी हे आज पी.एस.आय. बनले आहेत. डॉ. शैलेश डोंबे, ॲड. साहिल सय्यद आणि प्रसिद्ध चित्रपट निर्माते (प्रोड्युसर) जयंत लाडे हेदेखील याच क्लासचे माजी विद्यार्थी आहेत.या क्लासने आजवर हजारो विद्यार्थ्यांना शिस्त, स्वसंरक्षण आणि आत्मविश्वासाचे धडे देऊन विविध क्षेत्रांत यशस्वी बनवले आहे.

या प्रसंगी व्यासपीठावर आंतरराष्ट्रीय क्रीडा प्रशिक्षक श्री. सुनील वाघमारे सर, श्रावणी वाघमारे मॅडम, निजेंद्र चौधरी सर यांच्यासह क्रीडा व सामाजिक क्षेत्रातील अनेक मान्यवर, माजी विद्यार्थी आणि पालक मोठ्या संख्येने उपस्थित होते. सांगोल्यातील गुणवंत खेळाडूंना आणि तरुण पिढीला या क्लासच्या माध्यमातून पुन्हा एकदा आंतरराष्ट्रीय दर्जाचे प्रशिक्षण मिळणार आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here