सांगोला (प्रतिनिधी): शिक्षक विद्यार्थ्यांना संस्कार देऊन घडवण्याचे कार्य शाळेमध्ये करतात.विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासाकरता शाळेत जे संस्कार केले जातात त्या आधारेच विद्यार्थी समाजात घडत जातात .याकरिताच 40 वर्षापूर्वी शिंदे साहेबांनी आदर्श शिक्षण संस्थेचे रोपटे लावून ज्ञानार्जनाचे दालन खुले केले त्यामुळेच हा वटवृक्ष बहरलेला आहे. विद्यार्थ्यांनीही शालेय जीवनात भरपूर परिश्रम घेऊन उद्याचे सक्षम नागरिक तयार व्हावेत, विद्यार्थ्यांनी मोबाईलचा अतिरेक वापर करू नये, विविध राष्ट्रपुरुषांची आत्मचरित्रे वाचून त्यांचे विचार आत्मसात करावेत असे प्रतिपादन प्रशालेच्या 40 व्या वर्धापन दिनानिमित्त उद्धव पाटील सर यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त केले.

कार्यक्रमाची सुरुवातीस संस्थापक वामनराव शिंदे साहेब, सरस्वतीच्या प्रतिमेचे पूजन पंचायत समिती सदस्या राणीताई पाटील,गिरीशभाऊ नष्टे, संस्थाध्यक्षा श्रीमती कौशल्यादेवी शिंदे मॅडम, किशोर बनसोडे, मुख्याध्यापक विठ्ठलपंत शिंदे सर या मान्यवरांच्या हस्ते पुष्पहार अर्पण करण्यात आला.

यावेळी प्रमुख मान्यवरांचे स्वागत सचिव निलकंठ शिंदे सर यांनी केले व संस्थेची उद्दिष्टे,शैक्षणिक, सामाजिक कार्याचा आढावा अहवाल वाचन केले.वर्धापन दिनानिमित्त किशोर बनसोडे,गिरीश नष्टे , भालके मॅडम यांनी शुभेच्छापर मनोगत व्यक्त करून संस्थेबद्दल कृतज्ञता व्यक्त करून संस्थेच्या कार्यास शुभेच्छा दिल्या. यावेळी विद्यार्थ्यांनी वर्धापन दिनानिमित्त मनोगते केली. वर्धापन दिनानिमित्त घेण्यात आलेल्या विविध स्पर्धेचा बक्षीस वितरण समारंभ प्रमुख मान्यवरांच्या हस्ते पार पडला
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन,आभार संतोष कुंभार सर यांनी केले. कार्यक्रम यशस्वीतेसाठी प्रशालेतील शिक्षक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी परिश्रम घेतले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



