ठळक बातम्या – 03/10/2026

0

✒️ ज्ञानू इट्स डन ब्रो, आता राजीनामा द्या

▪️अभिजीत दिपकेंच्या कॉकरोच जनता पार्टीचं मुंबईत आंदोलन

▪️मुख्य निवडणूक आयुक्त ज्ञानेश कुमारांच्या राजीनाम्याची मागणी

▪️शिवाजी पार्कात तुफान गर्दी

✒️ सीजेपीच्या आंदोलनाला नेते-अभिनेत्यांचा पाठिंबा

▪️नसरुद्दीन शाह; विशाल ददलानी, शर्लिन चोपडासह दिग्गजांची हजेरी

✒️ पुण्यात MPSC पेपरफुटीविरोधात विद्यार्थ्यांचा एल्गार

▪️रोहित पवारांचा रात्रीपासून एस. एम. जोशी पुलावर ठिय्या; म्हणाले, ‘ भिमनवारांच्या राजीनाम्याशिवाय माघार नाही’

✒️ रोहित पवारांच्या आंदोलनावर भाजप आमदारांचा संताप

▪️सीजेपीचं आंदोलन म्हणजे अराजकता, मंत्री आशिष शेलारांची टीका

✒️ पुण्यात विद्यार्थ्यांच्या आंदोलनानंतर राज्य सरकारची मोठी कारवाई

▪️MPSC सचिव महेंद्र हरपाळकर यांची बदली

✒️ अमरावतीजवळ समृद्धी महामार्गावर भीषण अपघात

▪️सात जणांचा मृत्यू,18 जण जखमी

▪️नवरात्रौत्सवासाठी दुर्गादेवीची मूर्ती आणायला गेलेल्या तरुणांवर काळाचा घाला

✒️ माझ्यावर प्रदीप पूर्णेकरांच्या हत्येचा आरोप करण्यापूर्वी आधी आदित्य ठाकरेला अटक करा

▪️शिंदेसेनेच्या नेत्या मिनाक्षी शिंदेंचा संजय राऊतांवर पलटवार

✒️ गोकुळच्या जागावाटपाचा चेंडू मुख्यमंत्र्यांच्या कोर्टात

▪️ हसन मुश्रीफ, विनय कोरेंनी ठरावांचं गणित फडणवीसांना सांगितलं

✒️ ‘शिवाजी कोण होता’ पुस्तकाचे प्रकाशक प्रशांत आंबींची चौकशी

▪️आमदार संजय गायकवाडांचे पोलीस महासंचालकांना पत्र, मालमत्ता जप्त करण्याची मागणी

✒️ नाशिकरोड मध्यवर्ती कारागृहातील सुरक्षेचे धिंडवडे

▪️आधी चालतानाचा व्हिडीओ, आता थेट बॅरेकमधील सेल्फी; कैद्याकडून सर्रास मोबाईलचा वापर

✒️ लाठीचार्जमुळे गर्दी पांगवू शकता, पण आमचे प्रश्न थांबवू शकत नाही

▪️ज्ञानेश कुमारांना राजीनामा द्यावाच लागेल

▪️राहुल गांधींचा इशारा

✒️ सहा दशकांत बारामतीचा दुष्काळ कायमचा संपला का?

▪️भाजप नेते दिलीप खैरे यांचे शरद पवारांना पत्र, 8 थेट सवाल

✒️ ‘विनर्स अकॅडमी’ला ठोकले सील

▪️दिवेआगर दुर्घटनेनंतर प्रशासनाची मोठी कारवाई

✒️ दादासाहेब फाळके चित्रनगरीसाठी मानखुर्दची १४ एकर जमीन

▪️महसूल मंत्री चंद्रशेखर बावनकुळे यांची माहिती

✒️ आशियाई स्पर्धेत भारताचा सुवर्ण धमाका!

▪️एकाच दिवसात 6 सुवर्णपदकांसह 10 पदके

✒️ सुवर्णपदकाच्या मार्गात पाकिस्तानचा अडथळा !

▪️श्रेयसच्या नेतृत्वात भारतीय टी-२० संघाची आज अंतिम परीक्षा

✒️ निर्भेळ यशाचे लक्ष्य; गोलंदाजांवर पुन्हा लक्ष !

▪️भारताचा आज वेस्ट इंडिजविरुद्ध तिसरा एकदिवसीय सामना

✒️ जिल्हाधिकारी एस. कार्तिकेयन यांच्याकडून सांगोला -मंगळवेढा तालुक्यात दुष्काळी परिस्थितीची पाहणी

▪️पिकांचे नुकसान, पाणीटंचाई व चारा उपलब्धतेचा घेतला आढावा

▪️पंचनामे सरसकट व अचूक करण्याचे निर्देश

▪️नुकसानीचे अनुदान थेट बँक खात्यात द्यावे

▪️चारा डेपो व चारा छावण्यांऐवजी थेट अनुदान देण्याची शेतकऱ्यांची मागणी

✒️ मुंबई- पुणे मिसिंग लिंकला समांतर आता ‘वॉटर लिंक’

▪️उत्तर कोकणातील पुराचे २४९.४७ टीएमसी अतिरिक्त पाणी वळवण्यासाठी किसान आर्मी व वॉटर आर्मीचे नेते प्रफुल्ल कदम यांचा अभ्यासपूर्ण प्रस्ताव शासनाला सादर

▪️प. महाराष्ट्र, मराठवाड्यासह दक्षिणेकडील कर्नाटक, आंध्रप्रदेश, तेलंगणा, तामिळनाडू या सर्व राज्यांचा पाणी प्रश्न मिटणार

✒️ सांगोला आगारातून २७ हजार एनसीएमसी कार्डचे वाटप

✒️ रुमाल फिरवला अन् क्षणार्धात सोनं गायब !

▪️’आम्ही पोलीस आहोत’ म्हणत ६९ वर्षीय शेतकऱ्याला गंडा; २.८० लाखांचे दागिने लंपास

✒️ शेजाळ पाझर तलाव आटला; अजनाळेकरांच्या घशाला कोरड

▪️लाखो रुपये खर्चुनही महाराष्ट्र जीवन प्राधिकरण योजनेचा पाणीपुरवठा ठप्प

✒️ माजी खासदार मा. श्री. रणजितसिंहजी मोहिते-पाटील यांच्याकडून सांगोल्यातील कवी-साहित्यिकांचा गौरव

▪️गांधी जयंतीनिमित्त साहित्यिकांशी साधला संवाद; मान्यवरांच्या उपस्थितीत सन्मान सोहळा

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here