डॉ.अनिकेत (भैय्या) देशमुख यांच्या वाढदिवसानिमित मशरूम शेती व व्यवस्थापन प्रशिक्षण मोठ्या उत्साहात संपन्न 

0

सांगोला (प्रतिनिधी): – सोमवार दिनांक ५ ऑक्टोबर रोजी सांगोला तालुका शेतकरी शिक्षण प्रसारक मंडळ संचलित डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय, सांगोला यांच्या वतीने संस्थेचे सन्माननीय अध्यक्ष डॉ. अनिकेत चंद्रकांत देशमुख यांच्या वाढदिवसानिमित्त ‘इनोव्हेशन, इनक्युबेशन अँड रिसर्च अँड डेव्हलपमेंट सेल’ अंतर्गत मशरूम शेती व व्यवस्थापन प्रशिक्षण कार्यशाळा मोठ्या उत्साहात संपन्न झाली. कार्यक्रमाच्या सुरुवात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष कै.आ.डॉ. गणपतराव देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन प्रमुख मान्यवरांच्या हस्ते करून करण्यात आली.

कार्यक्रमाचे प्रास्ताविक महाविद्यालयाचे प्राचार्य. डॉ. शंकर धसाडे केले त्यामध्ये त्यांनी असे सांगितले कि सांगोला तालुक्यातील प्रगतिशील शेतकरी, बेरोजगार युवक, महिला व नवउद्योजक यांना मशरूम शेतीच्या माध्यमातून रोजगार व स्वयंरोजगाराच्या संधी उपलब्ध करून देणे, शेतकऱ्यांचे आर्थिक सक्षमीकरण करणे तसेच मशरूमचे पोषण व आरोग्यविषयक महत्त्व याबाबत जनजागृती करणे, हा या कार्यशाळेचा प्रमुख उद्देश आहे. त्यानंतर प्रमुख पाहुण्यांची ओळख कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. मनोजकुमार माने यांनी करून दिली. प्रमुख पाहुण्यांच्या ओळखी नंतर कार्यक्रमातील मान्यवरांचा सत्कार समारंभ संपन्न झाला.

सत्कार समारंभानंतर कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे व जी.बी.एस. मशरूम अँड ऍग्रो बिझनेसचे फाऊंडर आणि प्रमुख मा. प्रफुल्ल शेंडे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये त्यांनी मशरूमच्या वेगवेगळ्या जाती व मशरूम शेती कशी करावी, मशरूम उत्पादनासाठी आवश्यक साधने व तंत्रज्ञान, कमी जागेत मशरूम उत्पादन, मशरूम शेतीचे व्यवस्थापन, उत्पादन व व्यवसायाच्या संधी याबाबत सविस्तर माहिती सांगितली. प्रमुख पाहुण्यांच्या मार्गदर्शनानंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष व संस्थचे सचिव मा.श्री. विठ्ठलराव शिंदे यांनी आपले मनोगत व्यक्त केले. त्यामध्ये त्यांनी असे सांगितले कि दुष्काळग्रस्त सांगोला तालुक्यातील तज्ञ् शेतकऱ्यांना मशरुम हा एक आशेचा किरण आहे. तसेच या कार्यक्रमाचा लाभ घेऊन कमीत कमी पाच शेतकऱ्यांनी जरी मशरुम शेती यशस्वीपणे केली तरी ह्या कार्यक्रमाचे सार्थक झाले असे माझ्यासारख्याला वाटेल. या कार्यक्रमास विशेष उपस्थिती म्हणून केशरमाती उद्योगसमूहाचे प्रमुख श्री. सतीश पाटील, संस्थेचे संचालक प्रा.डॉ.अशोक शिंदे, जेष्ट डॉक्टर मच्छिन्द्र सोनलकर, शेंद्रीय शेतीचे मार्गदर्शक श्री. सुरेश पवार, कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.डॉ. शुद्धोधन कदम व व अनेक मान्यवर उपस्थित होते.

उदघाटन समारंभाच्या कार्यक्रमानंतर प्रमुख पाहुणे व मशरूम शेतीचे मार्गदर्शक व जी.बी.एस. मशरूम अँड ऍग्रो बिझनेसचे फाऊंडर आणि प्रमुख मा. प्रफुल्ल शेंडे यांनी माईंड सेट, माती विना शेती, स्पॉन, पॉसिटीव्ह सायकॉलॉजी अशा अनेक टेक्निकल विषयावर शेतकऱ्यांना द्वितीय सत्रात मार्गदर्शन केले. त्यानंतर एक तासाचा भोजनासाठी ब्रेक देण्यात आलेला होता. तिसरे सत्र २:३० वाजता सुरु झाले त्यामध्ये कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. मनोजकुमार माने यांनी शेतकऱ्यांना विशेष माहिती सांगितली. तसेच मशरुम शेतीची वेगवेगळी प्रात्यक्षिके करून दाखवली. सदर कार्यशाळेसाठी तालुका व तालुक्या बाहेरील जवळपास 67 शेतकऱ्यांनी व इतर महाविद्यालयातील बहुसंख्य विद्यार्थ्यांनी सहभाग नोंदविला.

समारोपाचा कार्यक्रम ४ वाजता सुरु झाला समारोपाचा कार्यक्रम संपन्न झाला. या कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थेचे संचालक प्रा.डॉ.अशोक शिंदे, व प्रमुख पाव्हणे म्हणून तालुका कृषी अधिकारी श्री. बाळासाहेब सावंत, प्रगतशील शेतकरी संदीप कुरे, दापोली विद्यापीठातील प्राध्यापक श्रीकांत रिटे, कार्यक्रमाचे समन्वयक डॉ. मनोजकुमार माने, कार्यक्रमाचे समन्वयक प्रा.डॉ. शुद्धोधन कदम व अनेक मान्यवर उपस्थित होते. कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन प्रा.डॉ. ज्योतिबा हुरदुके यांनी केले. तर कार्यक्रमाचे सुत्रसंचलन प्रा. शेख एन. एस. यांनी केले व टेक्निकल सपोर्ट म्हणून प्रा. रसाळ एन.एस व श्री. कादरी एम.जे. यांनी काम पाहिले. अशी माहिती प्रसिद्धी कमिटीचे चेअरमन प्रा. बाळासाहेब सरगर यांनी दिली आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here