सांगोला शहरात अनधिकृत बॅनर, फ्लेक्स, जाहिरात, डिजिटल बोर्ड लावल्यास कडक कारवाई होणार

0

सांगोला (प्रतिनिधी): सांगोला शहरातील डिजिटल बॅनर व फ्लेक्स लावण्यासंदर्भात विविध बाबीवर चर्चा करून आवश्यक उपाययोजना करण्यासाठी मा. नगराध्यक्ष यांचे अध्यक्षतेखाली सर्व डिजिटल बॅनर प्रिंटिंग व्यावसायिकांची बैठक मुख्याधिकारी यांचे दालनात आयोजित करण्यात आली होती. शहरात डिजिटल बॅनर व फ्लेक्स लावण्यापूर्वी नगरपरिषदेकडून आवश्यक परवानगी घेण्यात येऊन जनहित याचिका क्रमांक 155 /2011 मधील मा. सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार कार्यवाही करण्याबाबत मुख्याधिकारी यांनी सूचना केल्या.

सार्वजनिक ठिकाणी, चौकामध्ये, रस्त्यांच्या कडेला तसेच शासकीय मालमत्तेवर नगरपरिषदेची परवानगी न घेता अनधिकृत बॅनर, फ्लेक्स लावू नयेत असे मा. नगराध्यक्ष यांनी सांगितले. नगरपरिषदेने सांगोला शहरात परवानगी घेऊन डिजिटल बॅनर लावण्यासाठी एकूण ११ ठिकाणे निश्चित केलेली आहेत. शहरातील डिजीटल व्यवसायकांनी नगरपरिषदेकडून व्यवसाय ना-हरकत दाखला घेणे बंधनकारक आहे.

तसेच डिजिटल बोर्ड प्रिंट करतेवेळी त्यावर नगरपरिषदेकडून देण्यात येणारा क्युआर कोड प्रिंट करणे बंधनकारक आहे. डिजिटल बॅनर साईज १०x१०, १०x१५ व १०x२० फूट या प्रमाणात ठेवण्यात यावेत. सदर बैठकीसाठी मा. नगराध्यक्ष श्री. आनंदा माने, मुख्याधिकारी श्री. सुधीर गवळी, प्रशासकीय अधिकारी श्री. सचिन पाडे, प्र. स्वच्छता निरीक्षक श्री. महेश रजपूत आणि सर्व डिजिटल बॅनर प्रिंटिंग व्यावसायिक उपस्थित होते.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here