सांगोला पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री. राहुल देशपांडे यांच्या प्रमुख उपस्थितीत दुर्गामाता दौड उत्साहात संपन्न

0
Screenshot

सांगोला (प्रतिनिधी): दरवर्षी शारदीय नवरात्रात गावागावात आणि शहरातही श्रीदुर्गामाता दौड घटस्थापना ते विजयादशमी (दसरा) या कालावधीत काढली जाते पूर्ण शिस्तबद्ध स्वरूपात या दुर्गा माता दौडीत धारकरी सहभाग घेतात. ही परंपरा गेली अनेक वर्षे सातत्याने चालू आहे. दुर्गा माता दौड म्हणजे सर्व शिवभक्त एकत्रितपणे शिस्तबद्ध पद्धतीने चालणे किंवा धावणे. दुर्गामाता, कालीमाता, चंडीमाता, भारतमाता, गोमाता, हे सर्व एकच आहेत आणि हिंदू तरुण या मातांच्या चरणी धावत जाऊन देव, देश आणि धर्म यांच्याप्रति शपथ घेतात.

“श्रीदुर्गमाता दौड” सहावी माळ वासुद चौक – कर्मवीर नगर ,वासुद रोड नंतर वासुद चौक या मार्गाने अतिशय जल्लोषाच्या वातावरणात संपन्न झाली या दुर्गामाता दौड साठी सांगोला पोलीस स्टेशनचे कर्तव्यदक्ष पोलीस निरीक्षक श्री राहुल देशपांडे साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली. या सोहळ्याला उत्स्फूर्तपणे सर्व धारकरी उपस्थित होते.

शिवरायांसारखं रत्न या भारतभूमीला लाभण, या महाराष्ट्राच्या मातीत जन्माला येण हि साधी सोपी गोष्ठ नाही. हा एक ज्वलंत इतिहास पराक्रमाचा, आई भवानीच्या आशीर्वादाचा, या सह्याद्रीचा आणि सह्याद्रीत छातीची ढाल करणाऱ्या मावळ्यांना पुन्हा छत्रपती शिवाजी महाराज जन्माला यावा अस प्रत्येकाला वाटत असेल तर, हिंदूधर्म रक्षण करण गरजेच आहे. इतिहासातील छत्रपती शिवराय अजूनही जिवंत आहे आणि सूर्य चंद्रा सोबती जिवंतच राहील आणि तो आजच्या तरुण, बाल दोन्ही पिड्यांच्या नसानसांत आपल्याला पोचवण्यासाठी आणि याच शपथेवर आज संपूर्ण महाराष्ट्रात देशभरात दुर्गामाता दौड केली जात आहे. सर्व शिवभक्तांनी जास्तीत जास्त श्री दुर्गा माता दौडीत सहभागी व्हावे असे आवाहन शिवप्रतिष्ठान हिंदुस्थान यांच्या वतीने करण्यात येत आहे. संपर्क77410 50601, 92097 67042.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here