पत्रकार संघाच्या पदाधिकारी व सदस्यांना उपस्थित राहण्याचे आवाहन
सांगोला (प्रतिनिधी): अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाचे राष्ट्रीय अध्यक्ष मा. राजा माने साहेब यांच्या दौऱ्यानिमित्त रविवार, दि. २५ ऑक्टोबर रोजी सोलापूर जिल्ह्यातील पंढरपूर, मंगळवेढा आणि सांगोला येथे महत्त्वाच्या बैठकांचे आयोजन करण्यात आले आहे. या बैठकांना संघाचे प्रदेशाध्यक्ष मा. सतीश भाऊ सावंत यांची प्रमुख उपस्थिती राहणार आहे.

पंढरपूर येथील शासकीय विश्रामगृहात सकाळी ९:३० वाजता पहिली बैठक होणार आहे. यावेळी प्रदेशाध्यक्ष सतीश भाऊ सावंत, राज्य तांत्रिक सल्लागार नागनाथ सुतार, पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष प्रवीण नागणे यांच्यासह अन्य मान्यवर उपस्थित राहणार आहेत.

मंगळवेढा येथील नवीन शासकीय विश्रामगृहात सकाळी ११ वाजता दुसरी बैठक आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत संघाचे पदाधिकारी व सदस्य सहभागी होणार आहेत.

सांगोला येथे प्रदेशाध्यक्ष मा. सतीश भाऊ सावंत यांच्या कार्यालयात, गाळा क्रमांक २१, पहिला मजला, तहसील कार्यालयासमोर, दुपारी १२:३० वाजता बैठक होणार आहे.
या तिन्ही बैठकांना अखिल भारतीय डिजिटल मीडिया संपादक पत्रकार संघाच्या सर्व पत्रकार बांधवांनी, सदस्यांनी आणि पदाधिकाऱ्यांनी वेळेवर उपस्थित राहावे, असे आवाहन संघाचे सोलापूर जिल्हाध्यक्ष सचिन कुलकर्णी यांनी केले आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



