मुख्याध्यापक श्री. विठ्ठलपंत शिंदे यांना सूर्योदय फाउंडेशनचा ‘शिक्षक गौरव पुरस्कार’ प्रदान!

0

 

 कै. वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयात आनंदाचे वातावरण

सांगोला ( प्रतिनिधी): शिक्षण क्षेत्रात आपल्या वैशिष्ट्यपूर्ण उपक्रमांनी आणि अविरत परिश्रमांनी आदर्श निर्माण करणाऱ्या शिक्षकांचा सन्मान करण्यासाठी सूर्योदय फाउंडेशनच्या वतीने दरवर्षी पुरस्कार दिले जातात. यंदाचा अत्यंत प्रतिष्ठेचा ‘शिक्षक गौरव पुरस्कार’ कै. वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयाचे कर्तव्यदक्ष मुख्याध्यापक श्री. विठ्ठलपंत वामनराव शिंदे सर यांना जाहीर झाला आहे.

श्री. विठ्ठलपंत शिंदे सर यांनी आपल्या प्रदीर्घ सेवाकाळात केवळ शालेय अभ्यासक्रमावर भर न देता विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी अनेक नावीन्यपूर्ण उपक्रम राबवले आहेत. कर्तव्याच्या पलीकडे जाऊन सामाजिक बांधिलकी जपत त्यांनी ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना शिक्षणाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी मोठे योगदान दिले आहे. त्यांच्या याच शैक्षणिक आणि सामाजिक कार्याची दखल घेऊन सूर्योदय फाउंडेशनने त्यांना या पुरस्काराने सन्मानित केले आहे.

हा पुरस्कार जाहीर/ मिळाल्याने झाल्याचे समजताच कै. वामनराव शिंदे साहेब आदर्श विद्यालयातील सर्व शिक्षक वृंद, शिक्षकेतर कर्मचारी, आजी-माजी विद्यार्थी आणि शिक्षणप्रेमी नागरिकांमधून शिंदे सरांवर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे. सूर्योदय फाउंडेशनच्या या उपक्रमामुळे शिक्षण क्षेत्रात मोलाचे योगदान देणाऱ्या खऱ्या मार्गदर्शकाचा योग्य सन्मान झाला असल्याची भावना सर्व स्तरातून व्यक्त केली जात आहे. भव्य समारंभात प्रा नितीन बानगुडे- पाटील, अनिल इंगवले, डॉ बंडोपंत लवटे, जगन्नाथ भगत गुरुजी मान्यवरांच्या हस्ते शिंदे सर, सपत्नीक शिवांजली शिंदे मॅडम यांना हा गौरव प्रदान करण्यात आला. शिंदे सर यांचे सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here