सांगोला (प्रतिनिधी) : जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा, कमलापूर आणि प्रसन्न नवोदय फाउंडेशन, अकलूज यांच्या संयुक्त विद्यमाने इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी ‘नवोदय महा सराव परीक्षा – SEMI FINAL’ आयोजित करण्यात आली आहे. ही परीक्षा रविवार, दिनांक १५ नोव्हेंबर २०२६ रोजी जिल्हा परिषद केंद्र शाळा, कमलापूर येथे घेण्यात येणार आहे. परीक्षेसाठी २०० रुपये शुल्क निश्चित करण्यात आले आहे.

इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना जवाहर नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेची प्रभावी तयारी करता यावी, तसेच इयत्ता चौथीच्या विद्यार्थ्यांना फाउंडेशन स्तरावर मार्गदर्शन मिळावे, हा या उपक्रमाचा मुख्य उद्देश आहे.

या सराव परीक्षेचे वैशिष्ट्य म्हणजे विद्यार्थ्यांना नवोदयच्या अंतिम परीक्षेप्रमाणेच परीक्षा देण्याचा अनुभव मिळणार आहे. अंतिम परीक्षेतील क्रमांकानुसार बैठक व्यवस्था करण्यात येणार असून, अंतिम परीक्षेच्या धर्तीवर १६ पानांची प्रश्नपत्रिका आणि OMR उत्तरपत्रिका दिली जाणार आहे. प्रत्येक बेंचवर एकच विद्यार्थी बसविण्यात येणार आहे.

विद्यार्थ्यांना नवीन परीक्षा केंद्रावर परीक्षा देण्याचा अनुभव मिळणार असल्याने प्रत्यक्ष अंतिम परीक्षेच्या वेळी निर्माण होणारा मानसिक ताण कमी होण्यास मदत होणार आहे. परीक्षेनंतर अवघ्या तीन दिवसांत निकाल जाहीर करण्यात येणार असून, सहभागी सर्व विद्यार्थ्यांना डिजिटल प्रमाणपत्र दिले जाणार आहे. तसेच प्रत्येक केंद्रातील पहिल्या पाच टक्के गुणवंत विद्यार्थ्यांना ट्रॉफी देऊन गौरविण्यात येणार आहे.

नवोदय प्रवेश परीक्षेची तयारी करणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी ही परीक्षा अत्यंत उपयुक्त ठरणार असून, जास्तीत जास्त विद्यार्थ्यांनी या संधीचा लाभ घ्यावा, असे आवाहन आयोजकांच्या वतीने करण्यात आले आहे.

अधिक माहितीसाठी व नावनोंदणीसाठी संपर्क : श्री. सुनील आदलिंगे सर – ९५९५२०६२६३ (सांगोला तालुका संपर्क), मुख्याध्यापक श्री. बशीर मुलाणी गुरुजी – ८०१०७९१७१३, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री. अर्जुन पुजारी – ९८५०५९५८१२, शिक्षणप्रेमी नागरिक गुरुवर्य श्री. सुरेश ढोले गुरुजी – ७२१९४६१२०२

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



