सायकल रायडर्स असोसिएशनच्या सांगोला तालुका अध्यक्षपदी निलकंठ शिंदे सर 

0

सांगोला( प्रतिनिधी )- देशभरात शांती, समता, बंधुता या संत विचारांचा प्रचार व प्रसार करणाऱ्या तसेच आरोग्य, पर्यावरण, प्रदूषण, राष्ट्रीय एकात्मता यासाठी कार्य करणाऱ्या सायकल रायडर्स असोसिएशनच्या सांगोला तालुका अध्यक्षपदी युवा सायकलिस्ट निलकंठ शिंदे सर यांची निवड करण्यात आली आहे.

सांगोला येथे जेष्ठ सायकल रायडर्स प्रा डॉ प्रकाश बनसोडे, ॲड राजेश्वरी केदार यांच्या अध्यक्षतेखाली सांगोला तालुक्यातील सायकल रायडर्सची बैठक पार पडली. या बैठकीत सायकल रायडर्स असोसिएशनचे राष्ट्रीय अध्यक्ष सुर्यकांत भिसे, सचिव सुरेंद्र पिसे यांनी शिंदे सरकार यांना नियुक्तीचे पत्र दिले.

भिसे म्हणाले, सायकल रायडर्स असोसिएशन ही संघटना देशभरात शांती, समता, बंधुता हा संत विचार पोहोचवीण्याचे तसेच आरोग्य, पर्यावरण, प्रदूषण, राष्ट्रीय एकात्मता यासाठी कार्य करणारी संघटना म्हणून ओळखली जाते. सोलापूर जिल्ह्यासह महाराष्ट्र राज्यातील प्रत्येक तालुक्यात या संघटनेचे कार्य वाढावे, जास्तीत जास्त तरुण सायकलिंग क्षेत्राकडे वळावा व आरोग्य संपन्न भारत निर्माण व्हावा यासाठी सायकल रायडर्स असोसिएशन प्रयत्न करीत आहे. श्री शिंदे सरकार यांनी पंढरपूर ते घुमाणं ( पंजाब ) या सायकल वारीत 2500 किलोमीटर सायकल चालवून आदर्श निर्माण केला आहे. कन्याकुमारी, नेपाळ, भूतान,बांगलादेशसह सबंध भारतात सायकलिंग केलेले आहे सायकलिंग द्वारे शांतता, समता बंधुता व पर्यावरण संवर्धनाचा संदेश दिला आहे.त्यांच्या नेतृत्वाखाली सांगोला तालुक्यात सायकलिंग चळवळ क्षेत्रात वाढ होईल.

शिंदे सर म्हणाले, दोन वर्षापूर्वी घुमाणं सायकल वारीत सहभागी होता आले . आपलें आरोग्य उत्तम राखण्यासाठी आज सायकलिंगची गरज आहे. या बैठकीसाठी सायकलिस्ट आलनदीप टापरे सर, शैलेशराव चांडोले सर ,बाळकृष्ण टापरे, प्रकाश खडतरे, संजय अनुसे, ब्रहदेव सुरवसे, ॲड राजेश्वरी केदार, राहुल पाटील,राजलक्ष्मी केदार, दीपक काशीद , विठ्ठलपंत शिंदे, प्रथमेश गावडे, मोहन मिसाळ आदी उपस्थित होते. आभार सुरेंद्र पिसे यांनी मानले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here