ठळक बातम्या – 19/11/2026

0

✒️ बाळासाहेबांचा फोटो फाडल्यावरून वादंग

▪️शायना यांनी सोनियांच्या पुस्तकातील फोटो फाडल्याने विरोधकांकडून टीकेची झोड

▪️पालिकेत ठाकरे सेनेसह काँग्रेसचाही सभात्याग

✒️ हिवाळी अधिवेशन ७ डिसेंबरपासून

▪️दुष्काळ, पाणीटंचाई, शेतकऱ्यांना मदत हे कळीचे मुद्दे

▪️विरोधक विचारणार सरकारला जाब

✒️ मनमानी वेतन कपातीला लगाम

▪️कामाचे तास, साप्ताहिक सुट्टीबाबत महाराष्ट्र वेतन नियम २०२६ लागू

✒️ भारत आर्थिक संकटाच्या उंबरठ्यावर

▪️राहुल गांधी यांचा अमेरिकेत दावा

▪️राहुल हे भारतविरोधी प्रचाराचे नेते – भाजप

✒️ गारगाईसाठी साडेचार लाख झाडांचा बळी

▪️पर्यावरण अभ्यासक स्टॅलिन डी. यांचा दावा

✒️ ‘वाढवण’ विरोधी आंदोलन तीव्र

▪️वरोर नाक्यावर महिला, मच्छीमार, शेतकऱ्यांचा ‘रास्ता रोको’

✒️ दादर रेल्वे स्थानक लवकरच ‘चैत्यभूमी’

▪️नामकरणाची प्रक्रिया पूर्ण करणार – मुख्यमंत्री

✒️ लोणार’ला विशेष ओळखीची जागतिक झळाळी

▪️जागतिक भूवैज्ञानिक वारसा स्थळांच्या यादीत समावेश

▪️महाराष्ट्राच्या शिरपेचात आणखी एक मानाचा तुरा

✒️ लष्कर-ए-तोयबाचा कमांडर लतीफ भट ठार

✒️ रामलीला आंदोलनस्थळ करण्यास व्यापाऱ्यांचा विरोध

✒️ कॅफे आयडियल, चेतनासह नऊ रेस्टॉरंट्सचे परवाने निलंबित

▪️मुंबईत एफडीएची मोठी कारवाई

✒️ दाऊदच्या घरावर आज हातोडा

✒️ राजकुमारी कॅथरिन यांनी केली वाडियाची पाहणी

▪️मातांशी साधला संवाद

✒️ ठाकरेंचा निर्णय वैचारिक फारकत घेणारा

▪️मविआ सरकार स्थापनेबाबत शिंदे गटाचा सर्वोच्च न्यायालयात युक्तिवाद

✒️ सिंहगड संस्थेच्या नऊ शाळांवर प्रशासक नियुक्त

✒️ देशात कोळशाचा तुटवडा ?

✒️ शेअर बाजाराच्या तेजीला ब्रेक

▪️नफावसुलीमुळे सेन्सेक्स, निफ्टी घसरले

✒️ भारताची किवींविरुद्ध कसोटी

▪️वेलिंग्टन येथे आजपासून पहिला सामना

▪️बुमरा, पंतच्या पुनरागमनाकडे लक्ष

✒️ कर्णधाराबाबत उत्सुकता शिगेला

▪️२०२७च्या हंगामासाठी मुंबई इंडियन्सने १६ जणांना राखले कायम

✒️ भारतीय संघाचे चौथ्या जेतेपदाचे लक्ष्य

▪️महिला आशियाई चॅम्पियन्स ट्रॉफी हॉकी स्पर्धेला भोपाळमध्ये आजपासून प्रारंभ

✒️ सोलापूर डीसीसी बँकेच्या निवडणुकीत सांगोल्यात ‘शेकाप विरुद्ध शेकाप’ सामना !

▪️आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांच्याविरोधात शेकापचे निष्ठावंत कार्यकर्ते संजय इंगोले मैदानात

▪️तालुक्याच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण

✒️ सांगोला विद्यामंदिरमध्ये ‘१०० वर्षे निरोगी जगण्याचा कानमंत्र’ देणारी विशेष आरोग्य व आहार जनजागृती कार्यशाळा

▪️सांगोला तालुका शिक्षण प्रसारक मंडळ अमृत महोत्सवी वर्षानिमित्त आयोजन

✒️ कार्तिकी वारीत वारकऱ्यांना दर्जेदार आरोग्य सुविधा द्या

▪️ आरोग्य यंत्रणेला सभापती चेतनसिंह केदार सावंत यांचे निर्देश

✒️ सांगोल्यात ७ नोव्हेंबर ‘विद्यार्थी दिवस’ साजरा करण्याची मागणी

▪️आदेश न पाळणाऱ्या प्राचार्य मुख्याध्यापकांवर कारवाई करा

▪️नॅशनल दलित मुव्हमेंट फॉर जस्टीस सामाजिक संघटनेची मागणी

✒️ अजनाळेत आज रंगणार ‘डाळिंब चषक २०२६’ खो-खो स्पर्धेचा थरार

▪️१८ वर्षांखालील मुलांच्या स्पर्धेसाठी खेळाडूंना संधी

✒️ सांगोला भूमी अभिलेखमध्ये शेतकऱ्यांचे हेलपाटे..?

▪️ऑनलाईन अर्ज करूनही मोजणीची कामे प्रलंबित

▪️ खासगी व्यक्तींचा वाढता हस्तक्षेप, शेतक-यांमध्ये संताप

✒️ कोळा गावच्या शेकापच्या पहिल्या माजी सरपंच लक्ष्मीबाई पोरे यांचे निधन

✒️ कोळा – कोंबडवाडी रस्त्यावर धुळीचे साम्राज्य; विद्यार्थी, प्रवासी, नागरिक हैराण

▪️रस्त्याचे काम अपूर्ण, ठेकेदाराकडून पाणीही नाही; अपघातात वाढ, प्रशासनाने तातडीने लक्ष देण्याची मागणी

✒️ माण नदीपात्रातून अवैध वाळू उपसा; मध्यरात्री पोलिसांची कारवाई !

▪️वाळूने भरलेली बोलेरो पिकअप जप्त

▪️चिणके येथील तरुणाविरुद्ध गुन्हा दाखल

✒️ दिवाळीच्या गर्दीत सांगोला एसटी आगार मालामाल

▪️१२ दिवसांत १ कोटी ५४ लाखांचे विक्रमी उत्पन्न

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here