✒️ चीनला शह देण्याचे आखाडे
▪️बळाच्या वापराने परिस्थिती बदलण्याचा प्रयत्न करणाऱ्या एकतर्फी कृतींना ‘क्वाड’ परिषदेत विरोध
✒️ ३ हजार ४२ धरणांमध्ये ६४ टक्केच पाणी
▪️राज्यातील स्थिती चिंताजनक
▪️गतवर्षाच्या तुलनेत पाणीसाठ्यात २६ टक्क्यांची घट
✒️ ‘एसआयआर’बाबत ९ डिसेंबरला सुनावणी
✒️ एकमताने निर्णय झाल्याचा पुरावा नाही
▪️निवडणूक आयोगाच्या दाव्याला याचिकाकर्त्याचे आव्हान
✒️ दुष्काळाचे संकट गडद
▪️आणखी चार तालुक्यांत दुष्काळ घोषित
▪️राज्यात अन्य तालुक्यांचेही ग्राऊंड सर्वेक्षण होणार
✒️ आता सीसीटीव्हीचा मुद्दा ऐरणीवर
▪️अजित पवार अपघातप्रकरणी चौकशीची मागणी
✒️ सह्याद्रीच्या निसर्गसंपदेवर घाला घातल्याचा आरोप |
▪️’तारळी प्रकल्पा’ विरोधात गावकरी आक्रमक

✒️ डिझेल, विमान इंधनाच्या विंडफॉल करात वाढ
✒️ होर्मुझच्या सामुद्रधुनीत जहाजावर क्षेपणास्त्र हल्ला
✒️ आयडीबीआयचे कर्मचारी ३ डिसेंबर रोजी संपावर
✒️ स्मृतिदालनाचे लोकार्पण; नव्या वादाची चिन्हे
▪️बाळासाहेबांबद्दल खरी निष्ठा, प्रेम असलेल्या व्यक्तीच्या हस्तेच लोकार्पण – उद्धव ठाकरे
▪️शहांनी अजित पवारांच्या पुतळ्यासमोर माफी मागावी
✒️ ठाणे पोलीस आयुक्तांचे व्हॉट्सअॅप खाते हॅक
▪️स्टेट्सवर २० अश्लील चित्रफिती
✒️ तारळी प्रकल्पाविरोधात पोलिसांत तक्रार
▪️प्रकल्प हटवण्यासाठी लढा तीव्र करण्याचा निर्धार
✒️ जळगाव जिल्हा बँकेच्या निवडणुकीत महायुतीचे १२ उमेदवार बिनविरोध

✒️ बंगालच्या उपसागरात तिसरे वादळ
▪️ताशी १२० ते १४५ किलोमीटर वेगाने वारे वाहण्याची शक्यता
✒️ शेअर बाजारात दुसऱ्या दिवशीही तेजी
▪️गुंतवणूकदारांमध्ये खरेदी उत्साह कायम
✒️ कमी पावसाचा गव्हाला फटका
▪️देशात पेरणीत १५ टक्क्यांची घट
▪️रब्बी पीक ११ टक्क्यांनी घसरले
✒️ भारताचे फलोत्पादन पीक वर्षात विक्रमी होणार
▪️शेतीखालील क्षेत्र घटले; मात्र भाजीपाला, फळांच्या उत्पादनात वाढ
✒️ राज्यांची महसुली तूट वाढली
▪️रोख हस्तांतरण योजना वाढल्याचा परिणाम
✒️ धोनीची आयपीएलमधून निवृत्ती !
▪️आता चेन्नई सुपर किंग्जच्या मार्गदर्शकाच्या भूमिकेत दिसणार

✒️ मोहम्मद शमी राजस्थान रॉयल्सकडून खेळणार
✒️ मनू भाकरची खेळाडूंच्या समितीवर निवड
✒️ दुष्काळी परिस्थितीच्या पार्श्वभूमीवर देशभक्त संभाजीराव तथा दादासाहेब शेंडे यांचा ३० वा स्मृतिदिन साध्या पद्धतीने साजरा होणार
▪️विविध उपक्रमांचे आयोजन
✒️ इनरव्हील क्लब ऑफ सांगोलाची डीसी व्हिजिट उत्साहात संपन्न
▪️डॉ. दीपशिखा पाठक यांच्याकडून अध्यक्षांसह संपूर्ण टीमचे भरभरून कौतुक
✒️ वाहतूक सुरू ठेवल्यास ट्रॅक्टरचे टायर फोडू
▪️ऊसाला पहिली उचल ३५०० मिळेपर्यंत कारखाने बंद ठेवा
▪️राजू शेट्टींच्या इशाऱ्यानंतर शेतकरी रस्त्यावर
✒️ ७८ वर्षीय वृद्ध शेतकऱ्याचे तहसील कार्यालयासमोर उपोषण
▪️कलम १५५ चा दुरुपयोग करून फेरफार केल्याचा आरोप
▪️तत्कालीन तलाठी व मंडल अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल करून निलंबित करावे

✒️ वतनी जमिनींच्या संरक्षणासाठी १९ नोव्हेंबरला तहसीलदारांना निवेदनः बापूसाहेब ठोकळे
✒️ कार्तिकी यात्रेसाठी पोलीस प्रशासन सज्ज; वारकऱ्यांच्या सुरक्षेला सर्वोच्च प्राधान्य
✒️ तरंगेवाडीत बंद बंगल्याचे कुलूप तोडून लाखाचा ऐवज लंपास; चोरट्यांनी सीसीटीव्ही कॅमेरेही नेले
▪️चोरट्यांचा धुमाकूळ; भोपसेवाडी आणि पारे येथेही चोरीच्या घटना उघड
✒️ ऊसाला प्रतिटन ३५०० रुपये पहिली उचल जाहीर करा; अन्यथा तीव्र आंदोलन छेडणार
▪️सांगोला एस. टी. आगारातून एकही बस बाहेर पडू देणार नाही; शिवसेना शहरप्रमुख तुषार इंगळे यांचा इशारा
✒️ एसटी बसमधील गर्दीचा फायदा घेत महिलेचे ३ लाख ९ हजारांचे दागिने लंपास !
▪️हातात बाळ घेतलेल्या अनोळखी महिलेची शक्कल
▪️पर्समधील सोन्या-चांदीचा बटवा चोरून पोबारा
✒️ एका शेतकऱ्याच्या अडमुठेपणामुळे भोपसेवाडीचा साठवण तलाव रखडला !
▪️भीषण दुष्काळात माणसांसह जनावरांची पाण्यासाठी वणवणः पाण्याची पाइपलाइन तलावाजवळ येऊन थांबली

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



