सांगोल्यात शहीद दिनानिमित्त रक्तदान शिबीर संपन्न
सांगोला (प्रतिनिधी): दरवर्षीप्रमाणे या वर्षी ही 26/11 शहीद दिनाचे औचित्य साधून शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्या वतीने भव्य रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

या शिबिराचे उद्घाटन तहसीलदार बाळूताई भागवत, पो. नि. राहुल देशपांडे, रेल्वे पोलीस निरीक्षक सुहास जाधव, सांगोला नगरपालिका मुख्याधिकारी डॉ. सुधीर गवळी , वनसंरक्षक अधिकारी वनिता इंगोले, त्यांच्या हस्ते फित कापून करण्यात आले यावेळी डॉ निकीताताई बाबासाहेब देशमुख, दीपक बंदरे, आदर्श शिक्षण संस्थेच्या संस्थाध्यक्षा श्रीमती कौशल्यादेवी शिंदे मॅडम , माजी सैनिक संघटनेचे सर्व पदाधिकारी, आशाताई सलगर , रामभाऊ शिंदे , दत्ता नवले,ऐश्वर्या देशपांडे, नवनाथ शिंदे, भागवत भाटेकर गुरुजी, प्रितीश मंठाळकर यांची प्रमुख उपस्थित होती.

संघटनेचा हा उपक्रम सलग १७ व्या वर्षी मोठ्या उत्साहात आणि नागरिकांच्या उत्स्फूर्त प्रतिसादात संपन्न झाला.अशोक कामटे संघटनेच्या रक्तदान शिबिर उपक्रमातून आजपर्यंत 4500 रुग्णांना जीवनदान मिळाल्याने संघटनेचा उपक्रम प्रेरणादायी, कौतुकास्पद आहे,देशसेवेसाठी प्राणांची आहुती देणाऱ्या शूरवीरांना अभिवादन करण्याच्या उद्देशाने दरवर्षी हा सामाजिक उपक्रम राबवला जात असल्याचे गौरवउद्गार तहसीलदार बाळूताई भागवत मॅडम यांनी केले .

या शिबिरात तरुणांसह महिला आणि ज्येष्ठ नागरिकांनी मोठ्या संख्येने सहभागी होऊन रक्तदान केले. शिबिरात एकूण 129 रक्त पिशव्यांचे संकलन करण्यात आले. हे सर्व रक्त गरजू रुग्णांसाठी रेवनील ब्लड बँक सांगोला या रक्तपेढीकडे सुपूर्द करण्यात आले.

कार्यक्रमाच्या सुरुवातीला शहीद अशोक कामटे व शहिदांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन करण्यात आले. या प्रसंगी बोलताना संघटनेचे अध्यक्ष निलकंठ शिंदे सर म्हणाले की, “शहीद अशोक कामटे यांचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून आम्ही गेल्या १७ वर्षांपासून हा उपक्रम अखंडपणे राबवत आहोत. रक्तदान हेच सर्वश्रेष्ठ दान असून समाजातील गरजूंचे प्राण वाचवण्यासाठी तरुणांनी असेच पुढे येत राहावे.”कार्यक्रमाचे प्रास्ताविक व सूत्रसंचालन संतोष कुंभार सर यांनी केले.

शिबिर यशस्वी करण्यासाठी संघटनेचे पदाधिकारी ॲड हर्षवर्धन चव्हाण,मकरंद पाटील, रविंद्र कुलकर्णी,मुकुंद हजारे,मयूर ढोले, विनायक मस्के,तेजस कुरकुटे , शारीक तांबोळी,सुयोग बनसोडे, प्रा प्रसाद खडतरे, तोसिफ शेख , गणेश पाटोळे,अनिल तारळकर, ज्योतीराम यादव , प्रताप इंगोले,संकेत नवले आणि सर्व कार्यकर्त्यांनी विशेष परिश्रम घेतले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



