✒️ अखेर मीरारोडच्या जमिनीचा सातबारा पंतप्रधानांच्या बालमित्राच्या नावावर
▪️तब्बल १९ वर्षांचा संघर्ष यशस्वी
✒️ लोकसभेच्या जागा ५०% वाढणार
▪️केंद्रीय मंत्रिमंडळाचे शिक्कामोर्तब, आता खरी परीक्षा संसदेत
▪️२०२९च्या निवडणुकीपूर्वी महिलांना ३३ टक्के आरक्षण लागू होणार
▪️२०५१ पर्यंत वाढीव जागांची संख्या कायम ठेवण्याचा प्रस्ताव
▪️सत्ताधारी व विरोधी पक्षनेत्यांच्या जोर बैठका सुरू
▪️शरद पवार गटाच्या भूमिकेबद्दल उत्सुकता
✒️ टाटा सन्सची सोमवारी बैठक
▪️चंद्रशेखरन यांच्या पुनर्नियुक्तीला कोर्टाची स्थगिती नाही
✒️ मुंबई इंडियन्सचा कर्णधार पुन्हा रोहित शर्मा

✒️ धाराशिवमध्ये भीषण पाणीटंचाई; २२५ प्रकल्पांत केवळ ५ टक्के पाणीसाठा
▪️जिल्ह्यातील १९ गावांना २९ टँकरद्वारे पाणीपुरवठा सुरू. २१४ गावांतील विहिरींचेही अधिग्रहण.
✒️ तुळजाभवानी मंदिर ट्रस्टकडून दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांसाठी ३ कोटींची मदत
▪️मुख्यमंत्री सहाय्यता निधीसाठी आमदार राणाजगजितसिंह पाटील यांच्याकडून धनादेश सुपूर्द.
✒️ दुष्काळग्रस्त अल्पभूधारक शेतकऱ्यांना एक लाख रिक्षा देण्याची योजना
▪️परिवहनमंत्री प्रताप सरनाईक यांची घोषणा; दरवर्षी २० हजार रिक्षांचे वाटप करण्याचा प्रस्ताव.
✒️ महाराष्ट्रातील १ कोटी ४४ लाख शेतकऱ्यांची ॲग्रीस्टॅक नोंदणी पूर्ण
▪️ॲग्रीस्टॅक फार्मर आयडी नोंदणीत महाराष्ट्र देशात दुसऱ्या क्रमांकावर.
✒️ महाराष्ट्र महिला काँग्रेसच्या प्रभारी प्रदेशाध्यक्षांची नियुक्ती रद्द
▪️सुनीता गावंडे यांची नियुक्ती अखिल भारतीय महिला काँग्रेसकडून मागे घेण्यात आली.

✒️नागपुरात हिवाळी अधिवेशनासाठी हॉटेलचे दर गगनाला भिडले
▪️पंचतारांकित हॉटेलमधील एका दिवसाच्या मुक्कामाचे दर ७५ हजार रुपयांपर्यंत पोहोचल्याची माहिती.
✒️ पुण्याच्या कुरकुंभ एमआयडीसीमध्ये फार्मा कंपनीत स्फोट
▪️त्रिमूर्ती फार्मा कंपनीत स्फोट; प्राथमिक माहितीनुसार जीवितहानी नाही.
✒️ चंद्रपूर जिल्ह्यात वाघांच्या संख्येवर नियंत्रणासाठी नसबंदीचा प्रस्ताव
▪️वनविभागाकडून केंद्र सरकारकडे विशेष परवानगीचा प्रस्ताव पाठविण्यात आला.
✒️ मुंबईत रेल्वेचा मोठा कोचिंग डेपो उभारणार
▪️लोअर परळ-करी रोड परिसरात ९८ कोटी रुपये खर्चून नवीन डेपो उभारण्याची पश्चिम रेल्वेची योजना.
✒️ पुण्यातील वाहतूक कोंडी सोडवण्यासाठी ३६ प्रकल्पांचा आराखडा
▪️पाच भुयारी मार्ग, ३०० किलोमीटर मेट्रोचे जाळे आणि सहा उन्नत मार्गांचा समावेश.
✒️ कल्याण-बदलापूर रेल्वे मार्गावर मध्यरात्री विशेष ब्लॉक
▪️तिसऱ्या आणि चौथ्या मार्गिकेच्या कामासाठी काही लोकल फेऱ्या रद्द, तर काही एक्स्प्रेसच्या मार्गात बदल.

✒️ सांगली जिल्ह्यातील शिरढोणजवळ तीन कामगारांचा दुर्दैवी मृत्यू
▪️स्वच्छतेसाठी टाकीत उतरलेल्या तीन कामगारांचा गुदमरून मृत्यू.
✒️ शक्तिपीठ महामार्गाला कोल्हापुरात शेतकऱ्यांचा विरोध
▪️करवीर तालुक्यातील वाकरे येथे महामार्गाच्या जमीन मोजणीविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन.
✒️ तुळजापूर तीर्थक्षेत्र विकास आराखड्याला विरोध
▪️पुजारी, व्यापारी आणि स्थानिक नागरिकांचे तहसील कार्यालयासमोर उपोषण
✒️ बदलापुरात भटक्या कुत्र्यांच्या प्रश्नावरून संताप
▪️कुत्र्यांच्या पाठलागामुळे घाबरलेल्या १८ वर्षीय विद्यार्थ्याचा मृत्यू झाल्याची घटना.
✒️ पुण्यात शिवाजीनगर न्यायालयाबाहेरील हल्ला प्रकरणातील आरोपी अटकेत
▪️फरार आरोपीला पोलिसांनी दौंड तालुक्यातील कडेठाण येथून ताब्यात घेतले.

✒️ पुण्यात पीएमपी कर्मचाऱ्यांची माणुसकी
▪️रुग्णासाठी आणलेले २५ हजार रुपयांचे इंजेक्शन बसमध्ये विसरले; कर्मचाऱ्यांनी अवघ्या ४० मिनिटांत शोधून परत केले
✒️ मुंबईतील धारावीमध्ये २१० झाडांवर परिणाम होणार
▪️रस्ते विकासासाठी ६७ झाडे तोडण्याचा आणि १४३ झाडांचे पुनर्रोपण करण्याचा प्रस्ताव
✒️ राज्यात सोन्या-चांदीच्या दरात पुन्हा वाढ
▪️२७ नोव्हेंबरच्या वृत्तानुसार सोन्याचा दर प्रतितोळा १,२७,१७३ रुपयांवर पोहोचला.
✒️ सांगोला नगरपरिषदेच्या उपनगराध्यक्षपदी सौ. आशादेवी यावलकर यांची निवड
▪️स्वीकृत सदस्यपदी विजय पैलवान
✒️ २६/११ च्या शहीदांना रक्तदानातून मानवंदना
▪️सांगोल्यात ७३ जणांचे रक्तदान

✒️ सोलापूर जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या निवडणुकीत आमदार डॉ. बाबासाहेब देशमुख यांचा दणदणीत विजय !
✒️ सावे माध्यमिक विद्यालयात ‘बाल, अल्पवयीन आणि सक्तीच्या विवाहाचा निर्मूलनाचा आंतरराष्ट्रीय दिवस’ साजरा
✒️ न्यू इंग्लिश स्कूल व ज्युनिअर स कॉलेजमध्ये संविधान दिनानिमित्त उद्देशिकेचे सामूहिक वाचन
✒️ सांगोला महाविद्यालयात संविधान दिन उत्साहात साजरा
✒️ २५ वर्षांच्या सूर्यादित्य उर्फ यशराजे साळुंखे पाटील यांची जिल्हा मध्यवर्ती बँकेत दमदार एन्ट्री
▪️साळुंखे पाटील परिवारातील तिसऱ्या पिढीचा जिल्हा बँकेत दणक्यात प्रवेश
✒️ सोनके-तिसंगीतील कॅनॉलपट्टी रस्त्याची दुरवस्था
▪️आरपीआयचे दिपक चंदनशिवे यांचा आमरण उपोषणाचा इशारा
▪️रस्त्यावरील खड्डे, काटेरी झुडपे आणि अतिक्रमण हटविण्याची मागणी
✒️ कोळा येथील डॉ. बाबासाहेब आंबेडकर अस्थी स्मारक येथे संविधान दिन उत्साहात साजरा
✒️ 19 संचालक मंडळ सदस्यांपैकी तब्बल 18 जागांवर दणदणीत विजय !
▪️सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या निकालाचे चित्र आता स्पष्ट झालं आहे.
▪️19 संचालक मंडळ सदस्यांपैकी तब्बल 18 जागावर भाजप प्रणित पॅनलचे उमेदवार विजयी

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



