माणगंगा परिवार अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि., सांगोला दिनदर्शिका 2025 चे प्रकाशन दिमाखात संपन्न

0

माणगंगा परिवार अर्बन को-ऑप क्रेडिट सोसायटी लि., सांगोला या संस्थेच्या दिनदर्शिका 2025 चे प्रकाशन आज दि. 13 डिसेंबर रोजी संस्थेच्या मुख्य कार्यालयात मोठ्या उत्साहात संपन्न झाले. या कार्यक्रमाला सांगोला-मंगळवेढा तालुका प्रांताधिकारी श्री. बी.आर .माळी साहेब यांची प्रमुख उपस्थिती लाभली.

 

सदर सोहळ्यात संस्थेचे संस्थापक अध्यक्ष मा. श्री. नितिन (आबासाहेब) इंगोले, व्हा. चेअरमन श्री. सुखदेव रंदवे, संचालक श्री. विवेक घाडगे, श्री. विजय वाघमोडे, श्री. सचिन इंगोले, तसेच माणगंगा परिवाराचे सदस्य श्री. धनाजी शिर्के साहेब, संस्थेचे सीए श्री. ओम उंटवले, श्री. डोंब गुरुजी, अजयसिंह इंगोले, पत्रकार दिलीप घुले, श्री. दत्तात्रय खटकाळे साहेब, श्री. जयेश कांबळे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अक्षय मुढे व इतर सर्व कर्मचारी वृंद उपस्थित होते.

संस्थेचे अध्यक्ष श्री नितिन (आबासाहेब ) इंगोले यांनी प्रस्तावना करताना माणगंगा परिवारा विषयी माहिती दिली ..माणगंगा परिवार को-ऑप क्रेडिट सोसायटी ही संस्था चार वर्षांपूर्वी स्थापन झाली असून अल्पावधीतच तिने बँकिंग क्षेत्रात आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. संस्थेने ग्राहकांसाठी विविध अत्याधुनिक बँकिंग सेवा जसे की RTGS, NEFT, मोबाइल बँकिंग, IMPS, SMS बँकिंग, एफडी, आरडी, कर्ज योजना इत्यादी उपलब्ध करून दिल्या आहेत.

संस्थेच्या उत्कृष्ट कार्यामुळे संस्थेने बँकिंग क्षेत्रात नावलौकिक मिळवला असून माणगंगा परिवाराचा विस्तार दिवसेंदिवस वाढत आहे …

 

कार्यक्रमाच्या शेवटी उपस्थित मान्यवरांनी संस्थेच्या भविष्यातील यशस्वी वाटचालीसाठी शुभेच्छा दिल्या. माणगंगा परिवाराने ग्रामीण भागातील आर्थिक विकासासाठी मोलाची भूमिका बजावली असून यापुढेही संस्थेची प्रगती अशीच अविरत सुरू राहील, असा विश्वास व्यक्त करण्यात आला.सदर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन श्री विवेक घाडगे सर यांनी केले व आभार प्रदर्शन श्री अक्षय मुढे यांनी केले .

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here