प्रतिनिधी (शशिकांत कोळी) : सांगोला तालुक्यातील घेरडी गावचे सुपुत्र, रासपचे संस्थापक अध्यक्ष, माजी मंत्री महादेव जानकर यांचे विश्वासू सहकारी, सोलापूर जिल्हा नियोजन समितीचे सदस्य सोमाआबा गुलाबराव मोटे यांची राष्ट्रीय समाज पक्षाच्या राज्य उपाध्यक्षपदी निवड करण्यात आली असून राज्याचे मुख्य महासचिव ज्ञानेश्वर सरगर यांनी आज फलटण येथे हे निवडीचे पत्र दिले.
राष्ट्रीय समाज वाढविण्यामध्ये ज्यांनी अहोरात्र कष्ट करणारे सोमा (आबा) मोटे यांना त्यांच्या पक्षवाढी मध्ये सिंहाचा वाटा असल्यामुळे त्यांच्या कामाची पोच पावती राष्ट्रीय समाज पक्ष महाराष्ट्र प्रदेश उपाध्यक्ष पदी निवड केली. यावेळी राष्ट्रीय समाज पक्षाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष काशिनाथ नाना शेवते, मुख्य महासचिव माऊली नाना सलगर, केंद्रीय संघटक बाळकृष्ण लेंगरे मामा, केंद्रीय मुख्य महासचिव कुमार सुशिल पाल आदी उपस्थित होते.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक