सांगोला शहरातील खंडागळे मल्टिस्पेशालिटी हॉस्पिटल मध्ये महात्मा ज्योतिराव फुले जन आरोग्य योजना व आयुष्मान भारत – प्रधानमंत्री जन आरोग्य योजना अंतर्गत विविध आजारांवर उपचार सुरू असल्याची माहिती डॉ.परेश खंडागळे यांनी दिली.
या योजनेअंतर्गत अपेंडिक्स, हर्निया व हायड्रोसील न्युरोसर्जरी, युरोसर्जरी, प्लास्टिक सर्जरी मुत्रविकार, मुतखड्यावर निदान व उपचार,अल्सर कॅन्सर रोग निदान व सल्ला किडनीचे विकार टॉन्सिल, नाकातील हाड काढणे मुळव्याध इंजेक्शन व शस्त्रक्रिया करण्यात येणार आहेत.
याबरोबरच अस्थिरोग विभाग, स्त्रीरोग ,बालरोग ,मेडीसीन ,त्वचा व केस रोग, कान, नाक व घसा, सोनोग्राफी आदी विभागातील विविध आजारांवर उपचार करण्यात येणार आहेत. बांधकाम कामगारांसाठी मोफत उपचार व शस्त्रक्रिया सुविधा उपलब्ध आहे.ज्यांनी आजून या सुविधेसाठी लागणारे कार्ड अजून तयार केलेले नाहीये त्यांना त्वरीत खंडागळे मल्टीस्पेशालिटी हॉस्पिटलमध्ये काढून मिळेल.तसेच राज्य शासकीय कर्मचाऱ्यांना कॅशलेस सुविधा उपलब्ध आहे.तरी तालुक्यातील गरजू रुग्णांनी या योजनेचा लाभ घ्यावा असेही आवाहन करण्यात आले आहे.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक