माढा महाविद्यालयामध्ये रक्तदान शिबिर संपन्न 

0

माढा : रयत शिक्षण संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय माढा येथे राष्ट्रीय सेवा योजना व एनसीसी विभागाच्या वतीने सहकार महर्षी गणपतराव साठे यांच्या जयंती निमित्ताने रक्तदान शिबिर संपन्न झाले. या रक्तदान शिबिराचे उद्घाटन माढ्याचे माजी आमदार अँड . धनाजी तात्या साठे यांच्या शुभहस्ते झाले.

हे शिबिर महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील हेळकर यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात आले. यावेळी डॉ. सतीश घाडगे व प्रा. वैशाली गुंड यांच्यासह अनेकांनी रक्तदान केले. यावेळी इंग्रजी विभाग प्रमुख प्रा. अशोक लोंढे व युवा नेते वेदांत साठे उपस्थित होते. हे शिबिर यशस्वी करण्यासाठी राष्ट्रीय सेवा योजनेचे कार्यक्रम अधिकारी डॉ. दत्तात्रय काळेल व एनसीसी प्रमुख प्रा. राजाराम भोसले यांनी विशेष परिश्रम घेतले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here