सांगोला ( प्रतिनिधी): शहीद अशोक कामटे बहुउद्देशीय सामाजिक संघटनेच्यावतीने लोहमार्ग पोलिस स्टेशन पंढरपूर येथे सुरू करण्यात यावे या मागणीचे निवेदन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना देण्यात आल्याची माहिती हरी बाबर यांनी दिली.

महाराष्ट्राचे मुख्य देवस्थान पंढरपूर येथे असल्याने विठ्ठल रुक्मिणी दर्शनासाठी भारतातून भाविक ,भक्तगण, वारकरी संप्रदाय येतात , रेल्वे प्रवासी संख्या दिवसेंदिवस वाढत जात आहे, क्राईम ,रेल्वे अपघात, जखमी, प्रमाणात वाढ होत आहे, पंढरपूर स्टेशनवर , गव्हर्मेंट रेल्वे पोलीस (जी आर पी) , लोहमार्ग चौकी लहान असून पावसाळ्यात पाणी गळत आहे, सद्या बसण्यासाठी पुरेशी जागा उपलब्ध नाही, तसेच पंढरपूर वारीच्या वेळी पुणे लोहमार्ग येथून 100 ते 200 पोलीस कर्मचारी बंदोबस्त करण्यासाठी येतात त्यांना बसण्यासाठी जागा नाही, जसे आर पी एफ, यांना जश्या सोई सुविधा देता त्याप्रमाणे जी आर पी यांना देण्यात याव्यात ,पुढील काही दिवसात पंढरपूर येथे नवीन पोलीस ठाणे होणार आहे,तरी , येथे 3 ते 4 मजली इमारत बांधून लवकरात लवकर इमारत बांधुन रेल्वे प्रशासनाने द्यावी.

कुर्डूवाडी लोहमार्ग पोलीस ठाणे अंतर्गत पंढरपूर दुरक्षेत्र आहे ,पंढरपूर वर्षात चार मोठ्या वारी आहेत, वारीच्या वेळी रेल्वे गाड्या संख्या वाढवली जाते त्यामुळे प्रवासी वाढले जातत गर्दीमूळे रेल्वे अपघात , गुन्हे होतात विशेषत प्रवाशी महिलांना तक्रार दाखल करायची असल्यास कुर्डुवाडी लोहमार्ग पोलीस ठाण्यात जावे लागते , मिरज ते कुर्डुवाडी अंतर 190 किलोमीटर आहे, मिरज येथून येणाऱ्या प्रवासी यांना तक्रार देण्यासाठी कुर्डुवाडी येथे जावे लागते तरी दोन्ही पोलीस ठाण्यात अंतर जास्त असल्याने प्रवाशांची गैरसोय होत आहे पंढरपूर येथे लोहमार्ग पोलीस ठाणे होने गरजेचे आहे पंढरपूर येथे लोहमार्ग पोलीस ठाणे झाल्यास प्रवाशांची सोय होईल, विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोलापूर यांनी तात्काळ पंढरपूर रेल्वे स्थानकावर मंजुरी द्यावी,पंढरपूर लोहमार्ग पोलीस ठाण्याची इमारत निर्मिती करावी अशी आग्रही मागणी शहीद अशोक कामटे संघटनेने केली आहे. यावेळी संघटनेचे सदस्य व पदाधिकारी उपस्थित होते.

या निवेदनाची प्रत मा. अश्विनी वैष्णव, रेल्वे मंत्री, भारत सरकार, डॉ . पंकज भोयर, गृहनिर्माण, राज्य मंत्री महाराष्ट्र,महाव्यवस्थापक, मध्य रेल्वे मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस , पोलीस महासंचालक लोहमार्ग मुंबई, पोलीस अधीक्षक, लोहमार्ग पुणे, विभागीय रेल्वे व्यवस्थापक सोलापूर यांनी ही अशोक कामटे संघटनेच्या वतीने देण्यात आले आहेत.

रेल्वेच्या हद्दीतील कवठेमहांकाळ , ढालगाव, डोंगरगाव, सांगोला क्राईमच्या छोट्या – तक्रारीला सुद्धा प्रवाशांना कुर्डूवाडी या ठिकाणी जावे लागत असल्याने प्रवाशांना याचा मनस्ताप होत आहे , याची अनेक प्रवाशांनी संघटनेकडे मागणी केली आहे,पंढरपूर येथे लोहमार्ग पोलीस ठाणे निर्मिती/ मुख्यमंत्री कार्यालयाकडून मंजूर झाल्यास प्रवाशांना वेळेत तक्रार देता येणे शक्य होणार आहे. याचा रेल्वे विभागाकडे पाठपुरावा सुरू आहे.
निलकंठ शिंदे सर,
अध्यक्ष:-शहीद अशोक कामटे संघटना सांगोला

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



