वेस्ट झोन कराटे स्पर्धेमध्ये आरोही सावंत हिने पटकाविले रौप्य पदक

0

सांगोला (प्रतिनिधी): दि. ८ व ९ नोव्हेंबर रोजी नाशिक येथे झालेल्या वेस्ट झोन कराटे स्पर्धेमध्ये वाघमारे सरांच्या कराटे क्लासची विद्यार्थिनी आरोही सावंत हिने रौप्य पदक मिळवून घवघवीत यश संपादन केले. तिने आता दिल्ली येथे होणाऱ्या राष्ट्रीय कराटे स्पर्धेमध्ये आपले स्थान पक्के केले.

आरोही सावंत हिने सांगोल्याचे नाव राष्ट्रीय पातळीवर नेऊन सांगोला तालुक्याचे नाव उज्ज्वल केले आहे. आरोही सावंत हिस वाघमारे सरांच्या कराटे क्लास मध्ये श्रावणी वाघमारे व सुनील वाघमारे यांचे मार्गदर्शन लाभले. आरोही ही सध्या विद्यामंदिर इंग्लिश मीडियम येथे इयत्ता सातवी मध्ये शिकत असून तिच्या यशाबद्दल सर्वत्र कौतुक व अभिनंदन होत आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here