आपुलकीने खरी दृष्टी दिली –  दिव्यांग राजू बंडगर

0

आपुलकी प्रतिष्ठानच्या कार्यालयाचे अनोखे उद्घाटन!

सांगोला (प्रतिनिधी) – आम्ही दोघेही अंध असून आपुलकी प्रतिष्ठानमुळे आम्हास खऱ्या अर्थाने दृष्टी मिळाली आहे, त्यामुळे आमच्या जीवनात प्रकाश निर्माण झाला आहे. असे कौतुकोद्गार दिव्यांग राजू बंडगर यानी काढले. सांगोला तालुक्यात कार्यरत असलेल्या आपुलकी प्रतिष्ठान या सेवाभावी संस्थेच्या कार्यालयाचे उद्घाटन राजू बंडगर व सुरेखा बंडगर या अंध दाम्पत्याचे हस्ते करण्यात आले. त्यावेळी बंडगर यानी आपल्या भावना व्यक्त केल्या. नगरपरिषद पाठीमागे गाळा क्र.३ मध्ये सदर कार्यालयाचे उद्घाटन मान्यवरांच्या उपस्थितीत रविवारी संपन्न झाले.

आपुलकी प्रतिष्ठान अनेक समाजोपयोगी उपक्रम राबवत आहे. शैक्षणिक साहित्य वाटप, विद्यार्थ्यांना सायकल वाटप, गरजू व निराधार महिलाना शेळी वाटप, शिलाई मशीन, पिको फॉल मशीन वाटप, पिठ गिरणी वाटप, दिव्यांगाना तीनचाकी सायकल वाटप करुन आपुलकीने समाज जीवनात मानवतेचे महान कार्य केले आहे, असे गौरवोद्गार डॉ.प्रभाकर माळी यानी काढले. या प्रसंगी डॉ.प्रा.विजय जाधव ,ऍड.गजानन भाकरे, प्रा.राजेंद्र ठोंबरे, दिगंबर जगताप सर, सुरेश माळी, अस्तित्व संस्थेचे शहाजी गडहिरे, मंगळवेढा येथील प्रहार संघटनेचे जिल्हा उपाध्यक्ष माळी यानी मनोगत व्यक्त करुन शुभेच्छा दिल्या. विशेष म्हणजे या कार्यक्रमात हार, गुच्छ, फुले, बुके, शाल, सत्कार याना फाटा देवून केवळ शालोपयोगी वस्तुचा स्वीकार करण्यात आला. प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजेंद्र यादव यानी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले. या अनोख्या उद्घाटन सोहळ्यास शहरातील मान्यवर, पत्रकार बंधू, समाजसेवक व महिला भगिनी व आपुलकी सदस्य मोठ्या संख्येने उपस्थित होते.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here