रयत शिक्षण संस्थेचे कला व वाणिज्य महाविद्यालय, माढा येथील राष्ट्रीय सेवा योजना (NSS) विभागामार्फत सीमा नदीकाठी पूरपरिस्थितीमुळे प्रभावित झालेल्या नागरिकांना मदत करण्याच्या उद्देशाने निधी संकलन उपक्रम राबविण्यात आला.

या प्रसंगी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सुनील हेळकर यांनी स्वयंसेवकांच्या या समाजाभिमुख उपक्रमाचे कौतुक करताना सांगितले की, “विद्यार्थ्यांनी संवेदनशीलतेने आणि जबाबदारीने पुढाकार घेत पूरग्रस्तांसाठी केलेले कार्य हे समाजसेवेचे उत्कृष्ट उदाहरण आहे.”
या उपक्रमात महाविद्यालयातील विद्यार्थी, शिक्षक व कर्मचारी वर्गाने उत्स्फूर्तपणे सहभाग घेतला. स्वयंसेवकांनी माढा शहर व परिसरात जाऊन नागरिकांकडून आर्थिक मदत गोळा केली. जमा झालेला पुण्यश्लोक आहिल्यादेवी होळकर सोलापूर विद्यापीठ सोलापूर यांना निधी सुपूर्द करण्यात येणार आहे. जिल्हा प्रशासनामार्फत तो परत पूरग्रस्तांना दिला जाणार आहे. या उपक्रमाला स्थानिक नागरिकांकडून चांगला प्रतिसाद मिळाला.याप्रसंगी राष्ट्रीय सेवा योजना विभाग प्रमुख डॉ. दत्तात्रय काळेल व त्यांचे सहकारी प्राध्यापक यांनी परिश्रम घेतले.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक


