सांगोला (प्रतिनिधी): सर्व अत्याधुनिक बँकिंग सुविधांनी संपन्न असलेल्या माणगंगा परिवारच्या हातीद शाखेचा उद्या सोमवार दि. ०७/०७/२०२५ जुलै रोजी सकाळी १०.३० वाजता हातीद येथील जय भवानी चौक, बाजार पटांगणात भव्य उद्घाटन समारंभ सोहळा संपन्न होणार असल्याची माहिती संस्थापक अध्यक्ष नितीन इंगोले यांनी दिली.
उद्घाटन सोहळा श्री श्री श्री १०८ ष. ब्र. गुरुमुर्ती निर्वाण रुद्रपशुपती कोळेकर महास्वामीजी यांच्या शुभहस्ते संपन्न होणार आहे. कार्यक्रमाचे अध्यक्षस्थान श्री. बाजीराव दादासो घाडगे हे भूषविणार आहेत. यावेळी प्रमुख पाहुणे म्हणून सरपंच सौ. संगीता घाडगे, उपसरपंच श्री. संतोष आधटराव (कोळी), श्री, पवन गाडे, सौ. शोभा भुसनर, श्रीमती. नानुबाई भुसनर, श्री. श्रवण वाघमोडे, सौ. प्रतिभाताई व्हळगळ, श्री. संभाजी घाडगे, सौ. संगीता संजय भोसले, सौ. मोहिनी काटे, श्री. संजीत घाडगे, श्री. प्रदिपराव घाडगे, मा. श्री. राजेंद्र पाटील, वर्षा बरबडे, श्री. भाऊसाहेब घाडगे, सौ. शारदाबाई श्रीराम, श्री. गौतम होवाळ, श्री. तानसिंग घाडगे, श्री. भारत मिसाळ, श्री. बापुसो शिंदे. श्री. हिंदुराव घाडगे (सर), सौ.वनिता घाडगे, श्री. बाळासाहेब आलदर, डॉ. सुनिल पारखे, श्री. आप्पासाहेब घाडगे, सौ. विमल सरगर, श्री. तानाजी घाडगे, सौ. विमल सरगर, श्री. तानाजी घाडगे, सौ. अनुप्रिता शेलार, श्री. बाळासो घाडगे, श्री. बाळासो घाडगे, श्री. नारायण माळी, श्री. माणिकराव भगत, श्री. भगत सर, श्री. अमान तांबोळी आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.
तरी या उद्घाटन सोहळ्यास हातीद व परिसरातील ग्रामस्थांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे, असे आवाहन चेअरमन सी. अर्चना नितीन इंगोले, व्हा. चेअरमन श्री. सुखदेव नामदेव रंदवे, संचालक श्री. सचिन विठ्ठल इंगोले, श्री. विजय दादासाहेब वाघमोडे, श्री. विवेक हणमंत घाडगे, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. अक्षय मुढे यांच्यासह संचालक, सभासद व कर्मचारी वृंद यांच्यावतीने करण्यात आले आहे.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक