सोनंद (प्रतिनिधी): आषाढ महिना लागला की वेध लागतात पंढरीच्या वारीचे. चिमुकल्यांची वेशभूषा, टाळाचा गजर, पालखी सजवण्याची लगबग सालाबाद प्रमाणे सावित्रीबाई फुले प्रशाला व ज्युनियर कॉलेज सोनंद येथे शालेय विद्यार्थ्यांच्या दिंडीचे आयोजन करण्यात आलेले होते. सकाळी 11 वाजता पालखीचे पूजन संस्थेचे अध्यक्ष श्री ज्ञानेश्वर जी कोळसे पाटील यांच्या हस्ते झाले.

विद्यार्थ्यांकडून पंचपदी म्हणून घेण्यात आली टाळ वाद्यांच्या गजरात वातावरण भक्तीमय झाले या प्रसंगी संस्थापक अध्यक्ष श्री कोळसे पाटील सर यांचे विवाहाचा वाढदिवसाच्या योग आल्याने प्रशालेच्या वतीने मुख्याध्यापिका श्रीमती शेडसाळे व प्रशालेतील शिक्षकांच्या वतीने सत्कार संपन्न झाला व पालखीचे प्रस्थान झाले सय्यद बाबाच्या मंदिरामध्ये सर्व विद्यार्थ्यांनी जय जय राम कृष्ण हरी ज्ञानोबा तुकाराम च्या गजर व उत्साहाने खेळ नृत्य सादर केले दशमीच्या दिवशी सोनंद मध्ये भक्तीमय वातावरण झाले होते. प्रशालेतील सर्व शिक्षकांना संस्थेच्या वतीने शुभेच्छा देण्यात आल्या. शासन परिपत्रकाप्रमाणे सध्या एक जून ते आठ जून वन महोत्सव सुरू असल्याने इयत्ता दहावीच्या वर्गातील विद्यार्थी प्रमुख श्रवण संतोष काशीद ,श्रवण राजाराम काशीद सयाजी खंडागळे शिवकुमार काशीद यांच्या प्रेरणेने 12 आंब्याची झाडे प्रशालेस भेट दिली पर्यावरण संवर्धनाचे उपयोजन प्रशालेतील विद्यार्थ्यांनी केल्याने अनेक पालकांनी आनंद व्यक्त केला.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक


