डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालयमध्ये जिमखाना डे व पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन

0

सांगोला (प्रतिनिधी):- शुक्रवार दि. १३ फेब्रुवारी रोजी डॉ. गणपतराव देशमुख महाविद्यालय सांगोला मध्ये जिमखाना डे व पारितोषिक वितरण सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे अशी माहिती महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिकंदर मुलाणी यांनी दिली आहे. शुक्रवार दि. १३ फेब्रुवारी रोजी सकाळी ८:०० ते ९:०० वा. पारंपारिक वेशभूषा दिन साजरा होणार आहे.

तसेच सकाळी ९:०० ते १०:०० वाजता फनी गेम्स, १०:०० ते ११:०० वाजता फॅन्सी ड्रेस स्पर्धा आणि ११:०० ते दुपारी २:०० वाजेपर्यंत पाककला, पुष्परचना, पोस्टर मेकिंग, मेहंदी, फोटो इत्यादी स्पर्धांचे आयोजन करण्यात आले आहे. दुपारी २:०० ते ५:०० वाजेपर्यंत सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे.

कार्यक्रमाचा दुसरा दिवस म्हणजे रविवार दिनांक १५ फेब्रुवारी रोजी सकाळी ८:०० ते १०:०० या वेळेत संगीत खुर्चीचे आयोजन करण्यात आले आहे. तसेच सकाळी १०:०० ते ११:०० या वेळेत रांगोळी, हस्तकला, स्पर्धेचे उदघाटन होणार आहे. मुख्य कार्यक्रम म्हणजे पारितोषिक वितरण सोहळा सकाळी ११:०० ते १:०० या वेळेत होणार असून या कार्यक्रमासाठी प्रमुख पाहुणे म्हणून सुप्रसिद्ध लेखिका व कवयित्री मा.प्रा.डॉ. सुनिता बोर्डे-खडसे या उपस्थित राहणार आहेत. कार्यक्रमाचे अध्यक्ष म्हणून संस्थेचे अध्यक्ष मा.डॉ. अनिकेत(भैय्या) देशमुख हे उपस्थित राहणार आहेत.

तसेच संस्थेचे सचिव मा.श्री. विठ्ठलराव शिंदे व संस्थेचे सर्व संचालक मंडळ उपस्थित राहणार आहेत. दुपारी २:०० ते ५:०० या वेळेत शेलापागोटे कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. सदर कार्यक्रम यशस्वीपणे पार पाडण्यासाठी महाविद्यालयाचे प्राचार्य डॉ. सिकंदर मुलाणी, सांस्कृतिक विभागाचे चेअरमन प्रा.अशोक कांबळे, जिमखाना विभागाचे चेअरमन प्रा. विजय पवार, महाविद्यालयातील सर्व स्टाफ, विद्यार्थी, वियार्थीनी यांनी विशेष परिश्रम घेत आहेत.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here