✒️ आंबेडकर स्मारक रखडले
▪️खर्च वाढल्याने ३५० कोटींचा प्रस्ताव प्रलंबित
▪️कच्चा माल महागल्याने कंत्राटदाराने पुतळ्याचे काम थांबवले
▪️प्रकल्प पूर्ण होण्यास आणखी दोन वर्षांचा विलंब होण्याची शक्यता
✒️ नागपूरचे नाव ‘दीक्षाभूमी’ करा – उद्धव ठाकरे
✒️ राहुल गांधींचे मोदींवर टीकास्त्र
▪️तडजोड करणारे पंतप्रधान जागतिक नेत्यांशी चर्चा कशी करणार?
✒️ सलग नवव्या दिवशी सोन्याच्या दरात घसरण
▪️सोने ५,२००, तर चांदी ४,००० रुपयांनी स्वस्त
✒️ कार्तिकी यात्रेसाठी गजबजली अवघी पंढरी
▪️४ लाख भाविकांची मांदियाळी, गोपाळपूरच्या पुढे दर्शन रांग
▪️’ज्ञानोबा-तुकाराम’ जयघोषाने चंद्रभागेचा परिसर दुमदुमला

✒️ प्रभादेवीत रेल्वेच्या कारवाईला स्थगिती
▪️उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची केंद्रीय रेल्वे मंत्र्यांशी चर्चा
▪️रहिवाशांचे पुनर्वसन करण्याचे निश्चित झाल्याची दिली माहिती
✒️ नरेंद्र मोदींचा बारामती दौरा रद्द
✒️ एनसीईआरटीतून मराठा साम्राज्याचा नकाशा हटवला
▪️वंशजांची जनहित याचिका दाखल
✒️ टोरंट जलविद्युत प्रकल्पाविरोधात भाजप पदाधिकाऱ्याचा राजीनामा
✒️ आरसीएफच्या प्रकल्पग्रस्तांचे प्रश्न केंद्राच्या दरबारात
▪️आमदार महेंद्र दळवींची मंत्री मोहोळांशी चर्चा
✒️ जिल्हा बँकेतील पराभवाने भाजप नेते बिथरले
▪️शिवेंद्रसिंहराजे आणि जयकुमार गोरे यांच्यात जुंपली !
✒️ महाराष्ट्रात थंडीचा कडाका वाढणार

✒️ मुंबई अन् ठाण्याच्या पोलीस आयुक्तांना मोठं प्रमोशन !
▪️देवेन भारती, आशुतोष डुंबरे आता थेट ‘DGP’
✒️ काँग्रेसची राजस्थानात लाट
▪️जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुकीत भाजपचा पराभव
▪️मुख्यमंत्री शर्माना धक्का
▪️राजस्थानमध्ये काँग्रेसचा दणदणीत विजय, राहुल गांधी म्हणाले, हा जनादेश
✒️ भंडारा बाजार समितीत मित्रपक्षांचाच भाजपला ‘दे धक्का’
▪️काँग्रेसच्या साथीनं शिंदेंच्या शिवसेनेचा सभापतीपदावर कब्जा
▪️महायुतीतील अंतर्गत धुसफूस पुन्हा एकदा चव्हाट्यावर
✒️ कार्तिकी एकादशीनिमित्त एसटी महामंडळाच्या एक हजार बसेस सज्ज
▪️वारकऱ्यांनी एसटीच्या सेवेला प्रथम प्राधान्य द्यावं
▪️ मंत्री प्रताप सरनाईकांचं आवाहन

✒️ नागपूरचे नाव ‘दीक्षाभूमी करा, डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या सामाजिक क्रांतीची सुरुवात नागपुरातून
▪️हे नामांतर त्यांना खरी श्रद्धांजली ठरेल
▪️संजय राऊत यांची मागणी
✒️ सुप्रीम कोर्टाचा विमा कंपन्यांना दणका!
▪️धाराशिव जिल्ह्यातील शेतकऱ्यांना 2020 मधील नाकारलेले 227 कोटी रुपये देण्याचे निर्देश, न्यायालयीन लढ्याला यश
✒️ केंद्रातील काही मंत्री विरोधकांच्या संपर्कात, ते आतल्या गोटातील माहिती पुरवतात
▪️ राहुल गांधींचा सनसनाटी दावा
✒️ शेअर बाजाराची मुसंडी
▪️सेन्सेक्स ८९८ अंकांनी वधारला; निफ्टीने २५,८०० चा टप्पा गाठला
✒️ राहुल-पडिक्कलने न्यूझीलंडच्या गोलंदाजांना घाम फोडला!
▪️एका विकेटसाठी तरसले
▪️राहुलचे शतक

✒️ सांगोला विद्यामंदिरमध्ये अमृत महोत्सवी वर्षात आरोग्याचा अमृतयोग
▪️ निसर्गाशी मैत्री सांगणारी भोपाळचे डॉ. रमेश टेवानी यांची कार्यशाळा संपन्न
✒️ शासनाच्या ताब्यातील वतनी जमिनी मूळ वतनदारांना परत करा : बापूसाहेब ठोकळे
▪️सांगोल्यात वतनी जमीन संघर्ष समितीचा मोर्चा
▪️तहसीलदारांना निवेदन
✒️ शेर-ए-हिंद शहीद हजरत टीपू सुलतान यांची जयंती उत्साहात साजरी
▪️मुलाणी वस्तीवर विविध सामाजिक उपक्रम
✒️ अनुभवाला आधुनिक ज्ञानाची जोड देणारे निवड श्रेणी प्रशिक्षण महत्त्वाचे !
▪️विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रगतीला मिळणार नवी दिशा
▪️सांगोल्यात १४३ शिक्षकांचा सहभाग
✒️ शेतकऱ्यांच्या शेतरस्त्यांना आता मिळणार गती
▪️शासनाच्या नव्या नियमावलीमुळे कामे होणार जलद आणि पारदर्शक : सहअध्यक्ष अॅड. सचिन देशमुख
✒️ महुद रेल्वे गेट अचानक बंद; वाहनांच्या लांबच लांब रांगा, नागरिक हैराण !
▪️ना पूर्वसूचना, ना पर्यायी व्यवस्था
▪️नियोजनशून्य कारभाराचा नागरिकांना फटका
✒️ सांगोला बायपासवर ट्रकची एसटी बसला पाठीमागून जोरदार धडक
▪️पाच प्रवासी जखमी, दीड लाखांचे नुकसान
✒️ कोळा गावठाणमध्ये नऊ दिवसांपासून पाण्याचा ठणठणाट

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



