सांगोला (प्रतिनिधी):- हलदहिवडी विद्यालयाचे सहशिक्षक श्री.प्रकाश गळवे सर यांना “सुर्योदय फाउंडेशन यांच्या वतीने दिला जाणारा “आदर्श शिक्षक पुरस्कार 2025” पुरस्कार जाहीर झाला आहे.

विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानुन सरांनी विद्यार्थ्यांच्या सर्वांगीण प्रगतीसाठी स्वतःस झोकून दिले आहे त्यांचे आजपर्यंतचे इतरांना प्रेरक असे शैक्षणिक कार्य लक्षात घेऊन सूर्योदय फाउंडेशनचे वतीने आदर्श शिक्षक गौरव पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात येणार आहे. हा पुरस्कार सोहळा शनिवार दि.20 सप्टेंबर 2025 रोजी अहिल्यादेवी होळकर सभागृह, सांगोला येथे होणार आहे.

त्यांना मिळालेल्या या पुरस्काराबद्दल संस्थेचे सर्व पदाधिकारी संस्थेच्या अध्यक्षा श्रीमती अपर्णा येडगे मॅडम ,उपाध्यक्ष विश्वनाथ (नाना )चव्हाण, जेष्ठ संचालक विलास (बापू )येडगे, प्रशालेचे प्राचार्य मा.श्री. रामचंद्र जानकर सर, प्रशालेतील सर्व शिक्षक-शिक्षकेतर कर्मचारी स्टाफ, हलदहिवडी व शिरभावी सर्व ग्रामस्थच्या वतीने अभिनंदन करण्यात आले.


सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक


