सावे (प्रतिनिधी)- सावे येथे महाशिवरात्र महोत्सव व वार्षिक यात्रेनिमित्त सोमवार, दिनांक १६ फेब्रुवारी २०२६ रोजी भव्य कीर्तन सोहळ्याचे आयोजन करण्यात आले आहे. राज्याचे प्रसिद्ध समाजप्रबोधनकार ह.भ.प. निवृत्ती महाराज इंदुरीकर यांच्या सुश्राव्य कीर्तनाने हा भक्ती सोहळा रंगणार आहे.

हा कार्यक्रम पेनचे तहसीलदार श्री. तानाजी शिदा शेजाळ यांच्या विशेष सौजन्याने आयोजित करण्यात आला असून, सायंकाळी ६ ते ८ या वेळेत सावे येथे संपन्न होईल.

महाशिवरात्रीच्या पावन पर्वावर आणि ग्रामदैवताच्या यात्रेनिमित्त आयोजित या प्रबोधनपर सोहळ्यात सावे पंचक्रोशीतील भाविकांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहून कीर्तनाचा लाभ घ्यावा आणि यात्रेची शोभा वाढवावी, असे आवाहन संयोजक संजय सरगर व सावे ग्रामस्थांच्या वतीने करण्यात आले आहे.


सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



