कमलापूर येथे इयत्ता पाचवी शिष्यवृत्ती परीक्षेसाठी महासराव उत्साहात

0

कमलापूर (प्रतिनिधी): जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा कमलापूर येथे महाराष्ट्र राज्य परीक्षा परिषद पुणे मार्फत होणाऱ्या इयत्ता पाचवीच्या शिष्यवृत्ती परीक्षेच्या दृष्टिकोनातून शिवजयंतीचे औचित्य साधून शिष्यवृत्ती महासराव परीक्षेचे आयोजन करण्यात आले होते.

गुरुवर्य श्री सुरेश शिवदास ढोले तसेच शाळेचे मुख्याध्यापक बशीर मुलांनी गुरुजी तसेच कमलापूर केंद्रचे केंद्रप्रमुख श्री आप्पासाहेब पवार यांच्या मार्गदर्शनाखाली व जिल्हा परिषद प्राथमिक शाळा कमलापूर मधील सर्व शिक्षकांच्या सहकार्याने शिष्यवृत्ती महासराव परीक्षा पार पडली.

सदर सरावाला सांगोला तालुका तसेच पंचक्रोशीतील शाळांनी व शिक्षकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवून सदर संधीचा लाभ घेतला. हा सराव सकाळी दहा ते दुपारी तीन या वेळेत आयोजित करण्यात आलेला होता. सांगोला तालुक्यातील तसेच सांगली जिल्ह्यातील पालकांनी उत्स्फूर्तपणे सहभाग नोंदवला.

सदर परीक्षेच्या वेळी पर्यवेक्षिका म्हणून सौ रुपाली अमोल जाधव, सौ पूनम हनुमंत बंडगर, सौ स्वाती सचिन गोडसे यांनी उत्कृष्ट सहकार्य केले. सदर परीक्षेचे पेपर तपासून लगेच निकाल जाहीर करण्यात आला. सदर सरावाच्या वेळी श्री आबासाहेब पांढरे गुरुजी, सतीश सपताळ गुरुजी, नवनाथ गोडसे गुरुजी, अशोक हजारे गुरुजी, जगताप मॅडम, चांदोली मॅडम व बहुसंख्येने शिक्षक व पालक उपस्थित होते.

 

सध्याचा स्पर्धेचा काळ पाहता ग्रामीण भागातील मुलांमध्ये उच्च बुद्धिमत्ता असून देखील त्यांना आपल्या कलागुणांचे विकास व्हावा स्पर्धेमध्ये टिकून राहावीत या दृष्टीने अशा सर्वांची नियमितपणे आयोजन होणे गरजेचे आहे.

-श्री सुरेश शिवदास ढोले

ग्रामीण भागातील मुलांनी स्पर्धेत टिकून राहावे या दृष्टिकोनातून सदर महासरावाच्या आयोजन जिल्हा परिषद प्राथमिक केंद्र शाळा कमलापूर यांचे वतीने करण्यात आले व सदर सरावास पालकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद देऊन सहभाग नोंदवला.

 – श्री बशीर मुलाणी गुरुजी (मुख्याध्यापक)

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here