माणगंगा परिवार बँकेच्या हातीद शाखेचे उद्घाटन संपन्न
सांगोला (तालुका प्रतिनिधी): माणगंगा परिवार अर्बन बँकेने मजबूत आर्थिक सेवा आणि समाजाच्या विकासासाठी व सामाजिक बांधिलकीसाठी झपाट्याने नावलौकिक मिळवला आहे. संस्थेच्या स्थापनेपासूनच अतिशय पारदर्शक आणि ग्राहकांना प्रभावी सेवा देऊन संस्थेने ग्राहकांचा विश्वास संपादन केला आहे. तसेच विविध आकर्षक अशा सुविधा, बचत योजना राबवून सर्वसामान्यांना बचतीची माहिती देऊन सहकारास सामील करून त्यांचे जीवनमान उंचावण्याचे मोलाचे काम केले आहे. सर्व स्तरातील नागरिकांच्या अर्थकरणाला विश्वासार्हतेची जोड देत माणगंगा परिवार अर्बन निधी बँकेने अल्पावधीत ग्राहकांचा विश्वास संपादन करून बँकिंग क्षेत्रात आपली वेगळी निर्माण केली आहे असे मत माणगंगा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष नितीन इंगोले यांनी व्यक्त केले.
माणगंगा परिवार अर्बन को ऑप. क्रेडिट सोसायटी ली. सांगोला या बँकेच्या जय भवानी चौक, हातिद येथील शाखेच्या उद्घाटन प्रसंगी ते बोलत होते. यावेळी व्यासपीठावर श्री श्री श्री १०८ ष. ब्र. गुरुमुर्ती निर्वाण रुद्रपशुपती कोळेकर महास्वामीजी, संस्थेच्या चेअरमन अर्चना नितीन इंगोले, व्हा.चेअरमन सुखदेव रंदवे, संचालक सचिन विठ्ठल इंगोले, विवेक घाडगे सर, विजय वाघमोडे, मुख्य कार्यकारी अधिकारी अक्षय अनिल मुढे, ज्येष्ठ नेते बाजीराव घाडगे, हातीद गावच्या सरपंच संगीता घाडगे, ह.मंगेवाडी गावच्या सरपंच शोभा भुसनर, हातीदचे उपसरपंच संतोष आधटराव (कोळी), जुजारपूरचे सरपंच पवन गाडे, उपसरपंच नानुवाई भुसनर, उपसरपंच श्रावण वाघमोडे, राजुरीच्या सरपंच प्रतिभाताई व्हळगळ, संभाजी घाडगे (चेअरमन-संत नामदेव पतसंस्था), मोहिनी काटे (उपसरपंच, राजुरी), राजेंद्र पाटील (सरपंच, जुनोनी), शारदाबाई श्रीराम (उपसरपंच, जुनोनी), भारत मिसाळ (उपसरपंच, पाचेगांव), आप्पासाहेब घाडगे (चेअरमन-चि.का.सह.सो. हातीद), अनुप्रिता शेलार (तलाठी, हातीद), संजीत घाडगे (व्हा. चेअरमन संत नामदेव पतसंस्था), वर्षा बरबडे (मंडळ अधिकारी, हातीद), गौतम होवाळ (व्हा. चेअरमन-वि.का. सह.सो. हातीद), संगीता संजय भोसले (सरपंच, पाचेगांव),
प्रदिपराव घाडगे (माजी सरपंच, हातीद), भाऊसाहेब घाडगे (माजी तंटामक्ती अध्यक्ष), तानसिंग घाडगे (माजी तंटामुक्ती अध्यक्ष),बापुसो शिंदे (ग्रा. पं. सदस्य हातीद), हिंदुराव घाडगे सर (माध्यमिक शिक्षक), उपसरपंच उदनवाडी बाळासाहेब आलदर, डॉ. सुनिल पारखे, विमल सरगर (सरपंच, उदनवाडी), बाळासो घाडगे (मा. चेअरमन-संत नामदेव पतसंस्था), माणिकराव भगत (सर्टिफाईट ऑडिटर), प्रगतशिल बागायतदार तानाजी घाडगे, माजी सरपंच नारायण माळी, बापू भगत सर, गौतम होवाळ, अरमान तांबोळी, कुलदीप घाडगे, सचिन घाडगे, शंकर भंडगे, तानाजी भगत, बबन घाडगे, नाना खरात, शिवाजी चव्हाण, संभाजी चव्हाण, गणेश घाडगे, भारत सावंत, नागेश भंडारे, अमोल पवार, सिद्धार्थ ओहाळ, दादासाहेब घाडगे, गुलाब ओहाळ, धनाजी मलमे, विश्वास भगत यांच्यासह संचालक, सभासद व कर्मचारी उपस्थित होते.
यावेळी बोलताना माणगंगा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष नितीन इंगोले म्हणाले की, माणगंगा परिवार हा तालुक्याच्या विकासात भर घालणारा, सर्वसामान्य कुटुंबातील व्यावसायिकांचे जीवनमान उंचावणारा, गरीब व गरजू उद्योजकांना चांगली सेवा देणारा, सुशिक्षित बेरोजगार तरूणांच्या हाताला काम देणारा आहे. ठेवीदार अन ग्राहकांच्या हिताला प्राधान्य देताना माणगंगा परिवार अर्बन बँके लोकांच्या विश्वासाला पात्र ठरली आहे. माणगंगा परिवार अर्बन बँकेने संस्थेचे सभासद, ठेवीदारांशी जपलेली विश्वासार्हता आणि संस्थेच्या आर्थिक प्रगतीमध्ये हातभार लागला आहे. संस्थांमधील असलेला पैसा हा जनतेचा असून आपण फक्त त्याचे विश्वस्त आहोत याचे भान ठेवुन संस्थाचालक विश्वस्तांच्या भूमिकेत काम करीत आहेत. आणि सभासद, ग्राहक व हितचिंतक यांच्या अडचणींचे काळात आर्थिक सहाय्य देऊन ग्राहकांच्या मनात संस्थेबद्दल एक वेगळे स्थान निर्माण केले असल्याचे माणगंगा परिवाराचे संस्थापक अध्यक्ष नितीन इंगोले यांनी सांगितले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन संचालक विवेक घाडगे सर यांनी केले.
सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक