मुख्यमंत्री माझी लाडकी बहिण योजनेचा 16 वा हप्ता महिलांच्या खात्यावर वळता केला जाणार आहे. मात्र त्याआधी लाडक्या बहिणींना ई केवायसी करावी लागणार असल्याचं राज्याच्या महिला व बालविकास मंत्री अदिती तटकरे यांनी सांगितलं होतं. गेल्या महिन्याभरापासून ई केवायसी करताना मोठा अडचणी येत होत्या. कधी सर्वर डाऊन, कधी ओटीपी न येणे अशा समस्यांमुळे महिला मेटाकुटीला आल्या होत्या. यावरून मंत्री अदिती तटकरेंनी वेबसाईटमध्ये बदल होत असल्यामुळे आणि ई केवायसीसाठी वेळ लागत असल्याचं त्यांनी सांगितलं आहे.

मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या,” लाडकी बहीण योजनेच्या वेबसाईटमध्ये काही बदल होत आहेत. त्यामुळे वेळ लागत असल्याचं मंत्री अदिती तटकरे म्हणाल्या. ज्या महिलेचा पती आणि वडील नाही अशा महिलांसाठी वेबसाईटवर बदल केले जाणार आहेत. ही प्रक्रिया लवकरच पूर्ण होईल असंही त्यांनी सांगितलं. कोणतीही महिला लाभार्थी या योजनेपासून वंचित राहणार नाही.

लाडक्या बहिणींचा 16 हप्ता जमा होण्यासाठी त्यांना ई केवायसी करणे अनिवार्य करण्यात आले आहे. इ केवायसी शिवाय पुढील हप्ता त्यांच्या खात्यावर जमा होणार नाही अशा सूचना आहेत. ई केवायसी करण्याची अंतिम तारीख 18 नोव्हेंबर 2025 आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



