देशभरातील लाखो वैद्यकीय विद्यार्थ्यांचे भवितव्य ठरवणाऱ्या ‘नीट’ (NEET-UG 2026) परीक्षेबाबत राष्ट्रीय परीक्षा संस्थेने (NTA) आज अत्यंत महत्त्वाची घोषणा केली आहे. पेपरफुटीच्या प्रकरणांमुळे रद्द करण्यात आलेली नीटची परीक्षा आता २१ जून २०२६ रोजी पुन्हा घेतली जाणार आहे. ३ मे रोजी झालेल्या मूळ परीक्षेत अनियमितता आणि पेपरफुटीचे गंभीर आरोप झाल्यानंतर केंद्र सरकारने ही परीक्षा रद्द करण्याचा धाडसी निर्णय घेतला होता.

गत ३ मे २०२६ रोजी देशभरात नीट परीक्षा पार पडली होती. मात्र, परीक्षेच्या आधीच प्रश्नपत्रिका सोशल मीडियावर व्हायरल झाल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. तपासादरम्यान तपासी यंत्रणांना पेपरफुटीचे ठोस पुरावे मिळाल्याने परीक्षेच्या पारदर्शकतेवर प्रश्नचिन्ह उपस्थित झाले होते. या प्रकरणामुळे देशभरातील विद्यार्थी आणि पालकांनी आक्रमक पवित्रा घेत निदर्शने केली होती. परिस्थितीचे गांभीर्य ओळखून एनटीएने अखेर परीक्षा रद्द करण्याचा निर्णय घेतला होता.

जूनच्या अखेरीस परीक्षा होत असल्याने साहजिकच वैद्यकीय प्रवेशाचे पुढील वेळापत्रक (Counselling) काहीसे लांबणीवर पडण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षभरापासून जीवतोड मेहनत करून परीक्षा दिल्यानंतर ती रद्द झाल्यामुळे विद्यार्थ्यांमध्ये प्रचंड संताप होता. मात्र, आता अवघ्या काही दिवसांतच पुनर्परीक्षेची तारीख जाहीर झाल्याने विद्यार्थ्यांचा संभ्रम दूर झाला आहे. अभ्यासासाठी थोडा वेळ मिळाल्याने काही विद्यार्थ्यांनी समाधान व्यक्त केले आहे, तर पुन्हा परीक्षेला सामोरे जावे लागणार असल्याने काहींनी चिंता व्यक्त केली आहे.

सांगोला परिसर आणि राज्यातील बातम्या आणि माहिती सर्वात प्रथम मिळवण्यासाठी तुमच्या Whatsapp ग्रुपवर 78418 55301 हा आमचा नंबर समाविष्ट करा.
-
'सांगोला लाईव्ह'ला बातम्या व जाहिरात देण्यासाठी आजच संपर्क करा : 78418 55301
-
सोशल मीडियावर फॉलो करा -यूट्यूब, इन्स्टाग्राम आणि फेसबुक



